मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा काल २५ वा वाढदिवस झाला. सध्या आलिया बुल्गारियात शूटिंग करत आहे. धर्मा प्रॉडक्शनच्या ब्रह्मास्‍त्र सिनेमात आलिया-रणवीर ही जोडी पहिल्यांदाच दिसणार आहे. बुल्गारियाच्या सेटवर आलियाचा बर्थडे धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. या सेलिब्रेशनमध्ये रणवीर कपूरची आई नीतू सिंग देखील सहभागी झाल्या होत्या. मात्र रणवीर सिंग सेलिब्रेशनमध्ये कुठे दिसला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आलियाच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटोज आणि व्हिडिओज त्यांच्या फॅन्सने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 



आलियाच्या बर्थडे सेलिब्रेशमध्ये नीतू सिंग...



हायवे, कपूर अॅँड सन्स, उडता पंजाब यांसारख्या सिनेमातून आपल्या अभिनयाचा जलवा दाखवणारी आलियाने राजी सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले आहे. बुल्गारियामध्ये ती सध्या बह्मास्त्र सिनेमाचे शूटिंग करत आहे. तीन सीरीजमध्ये या सिनेमा बनेल. यात अमिताभ बच्चन देखील दिसतील. त्याचबरोबर गली बॉय या सिनेमातही आलिया रणवीर सिंगसोबत झळकेल. गली बॉयचे दिग्दर्शन जोया अख्तर देखील करत आहेत.