मुंबई : अभिनेत्री आलिया भट्टची बहीण शाहीन भट्टने तिच्या नैराश्याच्या लढ्याबाबत काही दिवसांपूर्वी खुलेपणाने सांगितलं होतं. आलिया आणि शाहीन यांची आई अभिनेत्री सोनी राजदान यांनी मी नेहमीच माझ्या मोठ्या मुलीबद्दल चिंताग्रस्त असल्याचे, याकाळात मी नेहमी तीची ताकद बनवण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले. एका टेलिव्हिजन मुलाखतीत शाहीनने तिचं पुस्तक 'नेव्हर बीन (अन) हॅप्पीअर' बाबत चर्चा केली होती. या पुस्तकात शाहीनने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिला केव्हा नैराश्याचा त्रास झाला, लहानपणी घडलेल्या कोणत्या घटनेमुळे तिला या नैराश्याच्या खाईत ढकललं अशाप्रकारच्या अनेक घटनांचा या पुस्तकात उल्लेख करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


भावनात्मकरित्या कशाप्रकारे तिने या परिस्थितीचा सामना केला? या प्रश्नावर सोनी राजदान यांनी न्यूज एजेन्सी 'आयएएनएस'शी बोलताना 'मी एक आई आहे. गोष्ट आलियाची किंवा शाहीनची कोणाचीही असूदे, परंतु कोणत्याही वेळी त्यांना समस्या येत असतील तर माझ्यावरच या सगळ्याचा प्रभाव पडत असतो. मी एक आई आहे आणि मी माझा माझ्या मुलांशी भावनात्मकरित्या जोडलेली आहे. त्यामुळे अनेकदा मी चिंतेत असल्यामुळे रात्री झोपत नसल्याचे' त्यांनी सांगितलं. इतक्या लहान वयात शाहीनने खूप काही सहन केल्याने शाहीनच्या बाबतीत मी खूप काळजीत होती. असंही त्यांनी म्हटलंय.



'एक आई असल्याने मला त्यावेळी शाहीनला मदत करुन तिला यातून बाहेर काढण्यासाठी काही योग्य निर्णय घेणे गरजेचे होते. मी त्यावेळी तेच केलं जे कोणत्याही आईने केलं असतं. वेळेसह आपण या सर्व गोष्टींचा लढा देण्यास शिकतो. सर्वप्रथम स्वत:ची स्वत:शी मैत्री होणं गरजेचं आहे' असंही त्यांनी म्हटलं आहे. 



सोनी राजदान यांनी वयाच्या ६०व्या वर्षी 'राजी', 'नो फादर्स इन काश्मीर', 'योर्स ट्रूली' यासारख्या चित्रपटातून काम करत सोनी राजदान यांनी सर्वांनाच आश्चर्यचकित केलं होतं. 'झी५' वर प्रदर्शित झालेला 'योर्स ट्रूली'मध्ये सोनी प्रमुख भूमिका साकारणार आहेत. यात आहाना कुमरा, पंकज त्रिपाठी तसेच महेश भट्ट हेदेखील भूमिका साकारणार आहेत.