Ranbir Kapoor-Alia Bhatt Wedding :  मुंबईत मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी लग्नगाठ बांधली. दोघांचीही कुटुंब आणि मित्रपरिवार यावेळी त्यांना साध देताना आणि मोठा आधार देताना दिसला. सर्वांचे आशीर्वाद आणि सदिच्छा स्वीकारत आलिया आणि रणबीर आता मिस्टर आणि मिसेस कपूर, म्हणून ओळखले जातील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नासाठी आलिया आणि रणबीरचा लूकही तितकाच देखणा होता. सुरेख अशा लेहंग्यामध्ये नववधू आलियाचं सौंदर्य खुलून आलं होतं. तर, तिच्या सौंदर्यानं गारद झालेला रणबीरही तितकाच रुबाबदार दिसत होता.


फक्त आलिया-रणबीर  नव्हेतर वऱ्हाड्यांचे वेडिंग लूक्सही तितकेच चर्चेत राहिले. लग्नासाठी करण जोहर, अयान मुखर्जी हे आलियाचे खास मित्रही उपस्थित होते.


छोटेखानी तरीही लक्षवेधी अशा या विवाह सोहळ्यानंतर लगेचच कपूर कुटूंबाच्या घराबाहेर असणाऱ्या पापाराझींचही तोंड गोड करण्यात आलं. या नवविवाहित दाम्पत्याला झी 24 तास कडून नव्या आयुष्याच्या अगणित शुभेच्छा.