मुंबई : जवळपास 4 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लग्नबंधनात अडकले आहेत. आलिया-रणबीरने मोजक्या पाहुण्यांमध्ये लग्नगाठ बांधली. या अत्यंत गुप्त लग्नाचे फोटो नुकतेच आलियाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंन्टवर शेअर केले. गुप्त ठेवलेल्या आलिया-रणबीरच्या लग्नाचा व्हिडिओ ओटीटीवर रिलीज होऊ शकतो, असं बोललं जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असे सांगितलं जात आहे की, आलिया-रणबीरचं लग्न गुपित ठेवण्यात मागचं कारण होतं ते म्हणजे, व्हिडिओचे हक्क OTT प्लॅटफॉर्मला महागड्या किमतीत विकले गेले आहेत. विशेष म्हणजे आलिया आणि रणबीर हे बॉलिवूडमधील सर्वात आवडतं जोडपं आहेत. त्यांचं लग्न पाहण्यासाठी चाहते काहीही करायला तयार असतात. दरम्यान, आलिया-रणबीरने सप्तपदी घेतली आहे. 



बॉलिवूडलाइफच्या रिपोर्टनुसार, आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचं लग्न येत्या काही महिन्यांत ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केलं जाईल. इतकंच नाही तर या जोडप्याला ओटीटी प्लॅटफॉर्मवर त्यांचे लग्नाचे हक्क विकण्यासाठी मोठी रक्कम देण्यात आली आहे. हक्कासाठी 90 ते 110 कोटी एवढी मोठी रक्कम देण्यात आल्याची माहिती आहे. आलिया किंवा रणबीरकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.