मुकेश अंबानींची लेक ईशाही रिलायन्समध्ये कर्मचारीच; मिळतो 'इतका' पगार

Mukesh Ambani daughter Isha Ambani Salary revealed : मुकेश अंबानी यांच्या लेकीला रिलायन्स उद्योग समुहाकडून किती पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल हैराण. 

Dec 02, 2024, 09:49 AM IST

Mukesh Ambani daughter Isha Ambani Salary revealed : मुकेश अंबानी यांच्या व्यवसायाची प्रगतीपथावर सुरू असणारी वाटचाल पाहता अनेकांनाच त्यांचा आणि या कामात त्यांना हातभार लावणाऱ्या त्यांच्या मुलांचा हेवा वाटतो. 

1/7

श्रीमंत व्यक्ती

Mukesh Ambani daughter Isha Ambani Salary revealed

Mukesh Ambani daughter Isha Ambani Salary revealed : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळख असणाऱ्या मुकेश अंबानी यांच्या श्रीमंतीविषयी वेगळं किंवा नव्यानं काहीच सांगण्याची गरज नाही. त्यांच्या संपत्तीचा 23088 कोटींचा आकडाच अनेकांना थक्क करून जातो.   

2/7

व्यवसायाची धुरा

Mukesh Ambani daughter Isha Ambani Salary revealed

अंबानींप्रमाणंच त्यांच्या मुलांची श्रीमंतीसुद्धा कायमच भुवया उंचावते. अंबानींच्या व्यवसायाची संपूर्ण धुरा सध्या त्यांच्या तिन्ही मुलांच्या खांद्यावर असून, यात त्यांच्या लेकीचा म्हणजेच ईशा अंबानीचाही मोलाचा वाटा आहे. 

3/7

एक कर्मचारी

Mukesh Ambani daughter Isha Ambani Salary revealed

ईशासुद्धा रिलायन्स उद्योग समुहातील एक कर्मचारी असली तरीही तिच्याकडे असणारं पद मात्र फार महत्त्वाचं आहे. Reliance उद्योग समुहातील अनेक विभागांचं नेतृत्त्व तिच्याकडे असून, वयाच्या अवघ्या 33 व्या वर्षी ती रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेड (RRVL) मध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहे. 

4/7

जबाबदारी

Mukesh Ambani daughter Isha Ambani Salary revealed

2006 मध्ये सुरू झालेल्या या कंपनीतील महत्त्वाची जबाबदारी ईशावर सोपवत मुकेश अंबानी यांनी तिच्यावर विश्वास दाखवला आणि ईशानंही हा विश्वास सार्थ ठरवत या कंपनीला जागतिक उंचीवर नेलं.   

5/7

उत्तम आर्थिक नियोजन

Mukesh Ambani daughter Isha Ambani Salary revealed

उत्तम आर्थिक नियोजनासाठी ईशा ओळखली जाते. उपलब्ध माहितीनुसार ईशा अंबानीला दर महिन्याला पगाराच्या स्वरुपात 35 लाख रुपये मिळतात. एका वर्षासाठी या पगाराची आकडेवारी जाते 4.2 कोटी रुपयांवर. 35 लाख रुपये ही फक्त ईशाच्या पगाराचीच आकडेवारी असून, यामध्ये तिला शेअरमधून मिळणारी रक्कम जोडण्यात आलेली नाही.   

6/7

रिलायन्स रिटेल

Mukesh Ambani daughter Isha Ambani Salary revealed

रिलायन्स रिटेलचं मूल्यांकन 8361 कोटी रुपये असून देशातील पहिल्या चार मोठ्या कंपन्यांच्या यादीत या कंपनीचंही नाव घेतलं जातं. ईशाच्याच नेतृत्त्वाअंतर्गत या कंपनीनं 18500 हून अधिक स्टोअर सुरू करत ऑनलाईन सामान विक्रीसुद्धा केली आहे. या स्टोअरमध्ये किराण्यापासून अगदी कपडे, विद्युत उपकरणं आणि औषधांचाही समावेश आबे. 

7/7

अर्थव्यवस्था

Mukesh Ambani daughter Isha Ambani Salary revealed

रिलायन्स रिटेलच्या यशात  AJIO, Tira, Dunzo, Netmeds, Reliance Digital आणि Reliance Trends या ब्रँडचंही मोठं योगदान आहे. ईशा अंबानी फक्त रिलायन्स उद्योग समुहाचीच धुरा पुढे नेत नसून, देशाच्या अर्थव्यवस्थेमध्येही ती मोठं योगदान देते.