Alia Bhatt and Ranbir Kapoor: रणबीरचा 'शमशेरा' हा चित्रपट गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. संजय दत्त, वाणी कपूर आणि रणबीर कपूरची या चित्रपटात प्रमुख भुमिका आहे. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला आहे. काही ठिकाणी शोज हे प्रेक्षकच नसल्यामुळे कॅन्सलही झाले आहेत. त्यामुळे सध्या या चित्रपटाची फारस वाईट अवस्था आहे. 'द काश्मिर फाईल्स' आणि 'भुलभूलैया 2' या चित्रपटांमुळे गांटांगळ्या खात असलेली ही इंडस्ट्री आता कुठे उभारू लागली होती पण आता गेल्या काही चित्रपटांची बॉक्स ऑफिसची स्थिती पाहता बॉलीवूडचे सध्या खराब दिवस चालू आहेत. रणबीरच्या 'शमशेरा' या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमधील इंडस्ट्रीला आशा होती पण हीही आशा फोल ठरली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'शमशेरा' या चित्रपटाच्या निमित्ताने रणबीर कपूरने चार वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर कमबॅक केले आहे. त्यामुळे रणबीरकडून त्याच्या चाहत्यांनी चित्रपटाबद्दल आशा लागून होती. या चित्रपटाचे प्रमोशनही मोठ्या प्रमाणावर करण्यात आले. परंतु अगदी दोन दिवसातच हा चित्रपट प्लॉप ठरला आहे. 


यावर रणबीर आणि आलियाची काय प्रतिक्रिया आहे याबाबत त्यांचे चाहते जाणून घेण्यास उत्सुक होते. तेव्हा त्या दोघांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्याचे समोर आले आहे. आलियाने आपली प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे की, ''हा चित्रपट मला फार आवडला आहे आणि रणबीर खूप जास्त मेहनत घेऊन आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.'' आलियाची ही प्रतिक्रिया पाहता रणबीरने पत्नीच्या प्रतिक्रियेबद्दल समाधान व्यक्त केले आहे. 


आपल्या पत्नीच्या प्रतिक्रियेवर रणबीर म्हणाला, 'माझ्यासाठी आलियाची प्रतिक्रिया आयुष्यातील सर्वात मोठी भेट आहे. माझ्या आयुष्यातील ती एक मोठी टीक मार्क आहे. त्यामुळे मी आनंदी आहे. ''अशी प्रतिक्रिया रणबीरने व्यक्त केली आहे. रणबीर आणि आलियाचे यावर्षीच्या एप्रिलमध्ये लग्न झाले. त्याच्या दोन महिन्यांनंतरच त्यांनी त्यांच्या बाळाची गूडन्यूज दिली होती.