मुंबई : बॉलिवूडच्या सर्वात आवडत्या कपल्सपैकी एक म्हणजे अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट.  रणबीर आणि आलिया वेगवेगळ्या प्रसंगी एकत्र दिसतात तेव्हा त्यांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होतात. एवढंच नाही तर रणबीर आणि आलिया सार्वजनिक ठिकाणी एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना दिसतात. नुकतेच हे कपल एका टीव्ही शोमध्ये पोहोचले, जिथे दोघांनी एकमेकांचं कौतुक केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शोदरम्यान आलियाला विचारण्यात आले की रणबीर कपूरची सुपरपॉवर काय आहे? या प्रश्नाचं उत्तर देताना आलिया म्हणाली की, रणबीरचा शांत स्वभाव ही त्याची सुपरपॉवर आहे. जेव्हा मी नाराज असते तेव्हा रणबीर मला शांत राहायला सांगतो. पुढे आलिया म्हणाली, 'रणबीर वादळातही शांत राहणाऱ्यांपैकी एक आहे.'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


यानंतर रणबीर कपूर आलिया भट्टला म्हणाला की,  आलिया अशी फटाका आहे जी पर्यावरणास अनुकूल आहे. असं म्हणत रणबीर म्हणाला, जेव्हा आलिया एखाद्याच्या आसपास असते तेव्हा तिला शांत राहण्यास सांगतो,  कारण तिला अनेकदा राग येतो.


रणबीर आणि आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, दोघे पहिल्यांदाचं 'ब्रह्मास्त्र' सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस  येणार आहे. दोघांशिवाय चित्रपटात अमिताभ बच्चन, मौनी रॉय, डिंपल कपाडिया आणि नागार्जुन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.