बॉलिवूडच्या 5 चित्रपटांनी पार केल्या सर्व मर्यादा
त्या बोल्ड चित्रपटांची आजही होते चर्चा
मुंबई : चित्रपटाची गरज म्हणून कलाकारांना सर्व भूमिका चोखपणे पार पाडाव्या लागतात. कथेची गरज म्हणून कलाकारांनी बोल्ड सीन देखील द्यावे लागतात. बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत, ज्यामध्ये कलाकारांनी सर्व मर्यादा पार केल्या. बोल्ड सीनमुळे काही चित्रपट आजही कायम चर्चेत असतात. त्यातील काही निवडक पाच चित्रपट...
'आस्था'
1997 साली प्रदर्शित झालेल्या 'आस्था' चित्रपटात अभिनेते ओम पूरी आणि अभिनेत्री रेखा यांनी सर्व मर्यादा पार केल्या. बोल्ड सीनमुळे चित्रपट तुफान चर्चेत आला होता.
'उत्सव'
1984 मध्ये प्रदर्शित झालेला 'उत्सव' चित्रपट बोल्ड सीनमुळे ओळखला जातो. या चित्रपटात रेखा एका महिलेच्या भूमिकेत आहेत जी लोकांना आकर्षित करते. या चित्रपटात अभिनेते शशी कपूरही आहे.
'रागिनी एम.एम 2'
2014 मध्ये आलेल्या 'रागिनी एमएम 2' या चित्रपटाबाबत देखील अनेक बोल्ड सीन आहेत. चित्रपटात हॉररसह जबरदस्त बोल्ड सीन्स आहेत.
'जिस्म 2'
2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जिस्म 2' ने देखील बोल्ड चित्रपटांच्या यादीत स्वतःचे स्थान निर्माण केलं आहे. या चित्रपटात सनी लिओन आणि रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत आहेत.
'हेट स्टोरी'
2012 साली प्रदर्शित झालेल्या विवेक अग्निहोत्रीच्या 'हेट स्टोरी' चित्रपटाने सर्व हॉटनेसचे रेकॉर्ड तोडले होते. या चित्रपटात एका मुलीची कथा दाखवण्यात आली आहे जी बदला घेण्यासाठी सर्व मर्यादा ओलांडते.