मासे खाल्यामुळे सोनूला झाली अॅलर्जी
सोनू निगमने स्वता:च्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये सानू आजारी असल्याचे समजत आहे.
मुंबई: बॉलिवूड गायक सोनू निगम सोशल मीडियावर अपडेट राहून दैनंदिन जीवनातील घडामोडी त्याच्या चाहत्यांना कळवत असतो. नुकताच सोनू निगमने स्वता:च्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये सानू आजारी असल्याचे समजत आहे. त्याचा एक डोळा सूजल्याचे दिसून येत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये त्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्या कारणामुळे ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. ओडिशामध्ये आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात सोनूने मासे खाल्यामुळे त्याला अॅलर्जी झाली. त्यामुळे सोनूला नानावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. याची माहिती सोनूने इंन्स्टाग्रामवरुन चाहत्यांना कळवली.
आज चांगले आणि वेगळे गायक आहेत
सोनू निगमने अलीकडेच सांगितले की, सतत शिकण्याची इच्छा मनात असल्यामुळे २५ वर्षांच्या तुलनेत आज उत्तम गात आहे.‘संदेशे आते हैं’,‘अंखियों से गोली मारे’, ‘साथिया’,‘अभी मुझमें कहीं’ अशा अनेक गाण्यांना सोनूने आवाज दिला आहे. गुरू हे आपल्या पेक्षा मोठा असेल असे नाही, लहान कलाकारांकडून सुध्दा खूप काही शिकण्यसारखे असते.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सोनू निगमने सांगितले की, जर तुमच्याकडे शिकण्याची इच्छा, विनम्रता असेल तर तुम्ही तरुण कलाकारांकडून शिकू शकता. आपण आपल्या मनाला काहीतरी नवीन शिकण्याच्या तयारीत ठेवायला हवे. ‘हमारे समय में सब बढ़िया था’ असे बोलणारे लोक कधीही आनंदी जिवन जगत नाहीत. असे वक्तव्य गायक सोनू निगम याने केले आहे.