कोरोनामुक्त झाल्यानंतर अल्लू अर्जुनने कुटुंब आणि स्टाफ मेंबर्सकरता उचललं मोठं पाऊल
अल्लू अर्जुनच्या या निर्णयाचं होतंय कौतुक
मुंबई : साऊथचे सुपरस्टार अल्लू अर्जुनने आपल्या केअरिंग नेचर आणि प्रेमळ स्वभावाची जोरदार चर्चा असते. 12 मे रोजी अल्लू अर्जुनने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये क्वारंटाईनची वेळ संपवून कोरोनामुक्त होऊन घरात प्रवेश केला आहे. या व्हिडिओत अल्लू अर्जुन मुलं, पत्नी आणि इतर स्टाफ मेंबर्ससोबत बोलताना दिसला.
महत्वाचं म्हणजे अल्लू अर्जुनने 45 वर्षांवरील इतर स्टाफ मेंबर्सला कोरोना व्हॅक्सीन लावून घेतलं आहे. याची सगळी तयारी स्वतः अभिनेता अल्लु अर्जुनने केलं आहे. देश अजूनही कोविड 19 च्या रूग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे.
'पुष्पा' स्टार अल्लू अर्जुनने स्टाफ मेंबर्स आणि कुटुंबाचं व्हॅक्सिनेशन करून घेतलं आहे. अल्लू अर्जुनने कायमच आपल्या स्टाफ मेंबर्सना आपल्या कुटुंबाचा भाग मानलं आहे.
अल्लू अर्जुनने सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्याला कोरोनाची लागण झाली आहे. 28 एप्रिल महिन्याच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, 15 दिवसांचा क्वारंटाईन होतो. अल्लूने दिलेल्या माहितीनुसार, 'सगळ्यांना हॅलो मला कोरोनाची लागण झाली आहे. मी घरीच स्वतःला आयसोलेट केलं आहे. सगळ्यांनी काळजी घ्या. मी त्या सगळ्यांना विनंती करतो की, जे माझ्या कॉन्टेक्टमध्ये आले त्यांनी स्वतःची चाचणी करावी.'
अल्लू अर्जुन काही दिवसांपूर्वी आपल्या कुटुंबासमवेत सुट्टी घालवण्यासाठी मालदीवमध्ये गेला होता. यानंतर तो आपल्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त झाला. काही दिवसांपूर्वीच त्याने त्याच्या आगामी ‘पुष्पा’ चित्रपटाचा टीझरही रिलीज केला होता, जो त्याच्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता.