`पुष्पा 2`च्या 4 दिवसांच्या कमाईमुळे प्रभासचा `हा` मोठा रेकॉर्ड धोक्यात
प्रदर्शित होताच `पुष्पा 2` चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. चार दिवसांच्या `पुष्पा 2`च्या कमाईने देशातच नाही तर जगभरात एक मोठा रेकॉर्ड केलाय.
Pushpa 2 Box Office Collection Day 4: अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या 'पुष्पा 2' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. हा चित्रपट 5 डिसेंबरला प्रदर्शित झाला. यानंतर या चित्रपटाने प्रत्येक दिवशी कमाईमध्ये वेगवेगळे रेकॉर्ड केले आहे. प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाच्या कमाईमध्ये मोठया प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. 'पुष्पा 2' चित्रपटाने चार दिवसांमध्ये केलेली कमाई पाहता या चित्रपटाने देशात नवीन रेकॉर्ड केलाय. या चित्रपटाने 500 कोटींची कमाई केली. कमी दिवसांमध्ये सर्वात जास्त कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे.
'पुष्पा 2' चित्रपटाच्या दुसऱ्या दिवशी कमाई ही कमी झाली. परंतु, यानंतर या चित्रपटाच्या कमाईमध्ये मोठी वाढ झालेली दिसत आहे. 'पुष्पा 2' चित्रपटाच्या जगभरातील कमाईकडे बघायच झालं तर रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2' चित्रपटाने चार दिवसांमध्ये 700 कोटींची कमाई केली आहे. मात्र, चित्रपटाच्या निर्मात्यांनी अद्याप या कमाईच्या बाबतीत संपूर्ण माहिती शेअर केलेली नाहीये. निर्मात्यांनी या चित्रपटाच्या तीन दिवसांच्या जगभरातील कमाई संदर्भात माहिती दिली आहे. ज्यामध्ये या चित्रपटाने 621 कोटींची कमाई केली. दररोज 'पुष्पा 2' च्या कमाईमध्ये वाढ होत आहे. यावरून अंदाज लावला तर हा चित्रपट 5 व्या किंवा 6 व्या दिवशी 1000 कोटींचा आकडा पार करण्याची शक्यता आहे.
'पुष्पा 2' चित्रपटाची चौथ्या दिवशी किती कमाई?
भारतात 'पुष्पा 2' चित्रपटाची कमाई ही चिपटाच्या पहिल्या भागाच्या एकूण कमाई पेक्षा जास्त झाली आहे. लवकरच 'पुष्पा 2' ही चित्रपट पहिल्या भागापेक्षा दुप्पट कमाई पार करू शकतो. सैकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2' चित्रपटाने चौथ्या दिवशी 141.5 कोटींची कमाई केली. ज्यामध्ये सर्वात जास्त कमाई ही हिंदी भाषेतील चित्रपटाने केली आहे. 'पुष्पा 2' चित्रपटाच्या चौथ्या दिवसाची एकूण कमाई 529.45 कोटी रुपये इतकी आहे. तर प्रभासच्या 'कल्कि 2898 एडी'ने देशभरात 646.31 कोटींची कमाई केली होती. लवकरच 'पुष्पा 2' या चित्रपटाचा रेकॉर्ड तोडू शकतो.
हिंदी भाषेतील चित्रपटाने गाठला 250 कोटींचा आकडा
चौथ्या दिवशी 'पुष्पा 2' च्या तेलुगू भाषेतील चित्रपटाने 44 कोटींची कमाई केली. यामधील हिंदी भाषेतील चित्रपटाने 85 कोटींची कमाई केली. 'पुष्पा 2' चित्रपटाच्या हिंदी भाषेतील चित्रपटाने आता पर्यंत एकूण 285.7 कोटींची कमाई केली. तर तेलुगू चित्रपटाने 198.55 कोटींची कमाई केली.