Pushpa 2 New Release Date: प्रतिक्षा संपली! `पुष्पा 2` चित्रपटाची नवीन रिलीज डेट समोर, `या` दिवशी होणार रिलीज
अल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षित चित्रपट `पुष्पा 2` ची रिलीज डेट 6 डिसेंबर ठेवण्यात आली होती. मात्र, आता त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. जाणून घ्या सविस्तर
Pushpa 2: The Rule : साउथ सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'पुष्पा 2' ची नवीन रिलीज डेट समोर आली आहे. 'पुष्पा 2' हा चित्रपट आधी 6 डिसेंबर रोजी रिलीज होणार होता. परंतु अल्लू अर्जुनने त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करून 'पुष्पा 2' चित्रपटाची नवीन रिलीज डेट संदर्भात खुलासा केला आहे.
'पुष्पा 2' कधी प्रदर्शित होणार?
अभिनेता अल्लू अर्जुनने काही वेळापूर्वी त्याच्या इन्स्टाग्रामवर 'पुष्पा 2' चित्रपटासंदर्भात मोठी अपडेट शेअर केली आहे. अभिनेत्याने शेअर केलेल्या पोस्टमध्ये अल्लू अर्जुन तोंडात सिगार आणि हातात पिस्तूल घेऊन उभा दिसत आहे. अभिनेता अल्लू अर्जुनने ही पोस्ट करताना हॅशटॅग वापरले आहेत. ज्यामध्ये तो म्हणाला आहे की, 'पुष्पा 2' हा चित्रपट 5 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.
2021 मध्ये आलेल्या पुष्पा चित्रपटाचा दुसरा भाग यापूर्वी 6 डिसेंबर 2024 रोजी रिलीज होणार होता. परंतु, आता त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. ज्यामध्ये तो नियोजित प्रकाशन तारखेच्या 1 दिवस आधी म्हणजेच 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित केला जाणार आहे.
'पुष्पा 2' चित्रपटाची कथा आणि कलाकार
2021 मधील 'पुष्पा' चित्रपटाची कथा जिथून संपली होती तिथून 'पुष्पा 2' चित्रपटाची कथा सुरु होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. एका सामान्य माणसाचा ब्रँड बनण्याची कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. 'पुष्पा 2' या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदाना देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय फहद फासिल देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रियामणी, श्रीतेज आणि अनुसया भारद्वाज देखील या चित्रपटाचा एक भाग आहेत.
रिलीजपूर्वीच 'पुष्पा 2'चित्रपटाने केली बंपर कमाई
2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा' चित्रपटाने मोठ्या प्रमाणात कमाई केली होती. त्यासोबतच या चित्रपटाने अनेक पुरस्कार देखील मिळवले होते. तर 'पुष्पा' चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच 100 कोटींची कमाई केली आहे. त्यानंतर प्रदर्शित होताच या चित्रपटाने 300 कोटींची कमाई केली.
मात्र, 'पुष्पा 2' या चित्रपटाने रिलीजपूर्वीच सर्व चित्रपटाचे रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटाने रिलीजपूर्वी 1000 कोटींहून अधिक कमाई केली आहे.