Allu Arjun Net Worth : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा: द रुल' चित्रपटानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आता त्याच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत. जेव्हा पासून या चित्रपटाचं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. तेव्हा पासून प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी आतुर आहेत. आज 8 एप्रिल रोजी अल्लू अर्जुनचा 42 वा वाढदिवस आहे. आजच त्याच्या चाहत्यांसाठी तो एक भेट देणार आहे आणि ती म्हणजे त्याच्या चित्रपटाचा टीझर... चला तर आज त्याच्या संबंधीत काही गोष्टी जाणून घेऊया. त्याची सुरुवात ही नेटवर्थपासून करुया...


अल्लू अर्जुन नेटवर्थ आणि प्रॉपर्टी...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत श्रीमंत कलाकारांमध्ये अल्लू अर्जुनचं नाव आहे. एका-एका चित्रपटासाठी अल्लू अर्जुन कोटींमध्ये मानधन घेतो. त्याशिवाय जाहिरातींमधून देखील त्याला चांगलीच रक्कम मिळते. तर रिपोर्ट्सनुसार, अल्लू अर्जुनची एकूण नेटवर्थ ही 460 कोटी आहे. अल्लू अर्जुनचं घर हैदराबादच्या जुबली हिल्स परिसरात आहे. त्याचं घर हे आतुनही आलिशान आहे. त्याच्या घरात एक पूल आहे. तर या घरीचा एरिया हा 8000 स्क्वेअर फीट असल्याचं म्हटलं जातं. अल्लू अर्जुनच्या या घराची किंमत ही 100 कोटी आहे. फक्त हैदराबादमध्येच नाही तर इतर ठिकाणी देखील अल्लू अर्जुनची घरं आहेत. तर 2015 मध्ये मुंबईत अल्लू अर्जुननं 2BHK फ्लॅट खरेदी केला. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


अल्लू अर्जुन कार कलेक्शन...


अल्लू अर्जुनच्या कार कलेक्शन विषयी बोलायचे झाले तर त्यात अनेक लग्झरीयस गाड्या आहेत. अनेकांचं असा गाड्या खरेदी करण्याचं स्वप्न असेल त्या गाड्या देखील अल्लू अर्जुनकडे आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याच्या कार कलेक्शनमध्ये बीएमडब्ल्यू एक्स6 कूव, पोर्शे आणि जॅगवार या गाड्या आहेत. त्याशिवाय त्याच्याकडे हमर H2, जॅगवार XJ L, वोल्वो XC90 T8 एक्सीलेंस, BMW X6 M स्पोर्ट आणि मर्सिडीज GLE 350d गाड्या देखील आहेत. तर त्याच्या या प्रत्येक गाडीची किंमत ही कोटींमध्ये आहे. 


हेही वाचा : 'हातात ब्लेड होतं अन् मग...', चाहत्याशी हात मिळवणं अक्षय कुमारला पडलं महागात


याशिवाय अल्लू अर्जुनची एक व्हॅनिटी व्हॅन देखील आहे. त्याच्या या व्हॅनिटी व्हॅनची किंमत 7 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातं. त्याशिवाय एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अल्लू अर्जुनप्रमाणे ही गाडी मॉडिफाय करण्यात आली आहे. त्याची ही व्हॅनिटी व्हॅन फार लग्झरीय आहे. यात टीव्ही पासून सगळं काही आहे.