प्रसिद्ध अभिनेत्याच्या व्हॉनिटी व्हॅनला अपघात
व्हॅनमध्ये मेकअप कलाकार देखील होते.
मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या व्हॉनिटी व्हॅनला अपघात झाला आहे. मात्र अपघात झाला तेव्हा अल्लू अर्जून व्हॅनमध्ये उपस्थित नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. शनिवारी खम्मम या ठिकाणी हा अपघात झाला. एका ट्रकने त्याच्या व्हॅनला मागून धक्का दिला. व्हॅन आंध्रप्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्याच्या एजन्सी क्षेत्रातील मरुदुमली येथून हैदराबाद जाण्यासाठी निघाली होती. याचदरम्यान ही दुर्घटना घडली.
याप्रकणी खम्मन ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महत्त्वाचं म्हणजे जेव्हा व्हॅन सेटच्या दिशेने कूच करत होती, तेव्हा व्हॅनिटी व्हॅनमध्ये अल्लूचे मेकअप कलाकार उपस्थित होते. पण नशीब बलवत्तर असल्यामुळे त्यांना देखील कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही.
अल्लूच्या आयुष्यातील ही महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची व्हॅन भारतातील कंपनी बेंझने बनवली आहे. या व्हॅनची किंमत जवळपास 7 कोटींच्या घरात आहे. तर अल्लूने त्याच्या व्हॅनचे नाव फॅल्कन ठेवलं आहे. अल्लू अर्जूनने त्याच्या कारकिर्दीची सुरूवात 'गंगोत्री' चित्रपटाच्या माध्यमातून केली.
त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. त्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपट हाऊसफुल असतो. त्याच्या 'आर्या' चित्रपटाने तर प्रेक्षकांच्या मन घर केलं आहे. सध्या तो त्याच्या आगामी 'त्रिविक्रम' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.