आधीच उन्हाळा त्याच हॉट लूकची बरसात...अमिषा पटेलच्या फोटोशूटवर चाहत्यांच्या कमेंट्स
अमिषा पटेलने पुन्हा एकदा चाहत्यांवर तिच्या सौंदर्याची जादू केली आहे. बिकीनी लूकमध्ये `गदर`च्या सकिनाचा हॉट लूक
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल तिच्या सिंगल लाईफचा आनंद घेत आहे. अमिषा तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतच अमिषा पटेलने तिच्या लेटेस्ट फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे. जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अमिषा पटेल पुन्हा एकदा तिच्या सौंदर्याची जादू चालवताना दिसत आहे.
अमिषा पटेलच्या या व्हिडिओबद्दल बोलायचं झालं तर अमिषा सूर्यप्रकाशात फोटोशूट करताना दिसत आहे. सूर्याची सोनेरी किरणे पडताच अमीषाचा लूकही सोन्यासारखा चमकताना दिसतो. यादरम्यान अमिषाने तिची श्रग उघडली आणि एकापेक्षा एक सिझलिंग पोज दिल्या. अमिषा पटेलची ही पोज पाहिल्यानंतर चाहत्यांकडून हॉट लूकवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
'गदर'मधील 'सकीना'च्या भूमिकेनंतर प्रसिद्ध झालेली अमीषा पटेल 45 वर्षांची आहे मात्र तिनं अद्याप लग्न केलेले नाही. सिनेमाच्या पडद्यासोबतच अमिषा पटेल खऱ्या आयुष्यातही खूप बोल्ड आहे. अमिषा सोशल मीडिया आणि इव्हेंटमध्ये खूप सक्रिय असते आणि अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडिओ दररोज सोशल मीडियावर व्हायरल होतात.
अमिषा पटेलच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच 'गदर 2' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात ती पुन्हा एकदा सनी देओलसोबत दिसणार आहे. हा चित्रपट 2001 मध्ये आलेल्या 'गदर' चित्रपटाचा सिक्वेल आहे. काही दिवसांपूर्वीत या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. या चित्रपटात अमिषा पटेल आणि सनी देओलची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. मात्र, खऱ्या आयुष्यात अमिषा पटेल 'सकीना'पेक्षा खूपच वेगळी आहे.