Ameesha Patel on Gadar 3 : 'गदर 2' ची क्रेझ आजही प्रेक्षकांमध्ये तिथेच पाहायला मिळेल. हा 2023 चा सगळ्यात गाजलेला चित्रपट ठरला होता. बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमीषा पटेनं त्यांच्या भूमिकेनं पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. चित्रपटात उत्कर्ष शर्मा, सिमरत कौर आणि आणखी अनेक कलाकार होते. गेल्या वर्षी चांगलाच चर्चेत राहिलेल्या 'गदर 2' या चित्रपटाला मिळालेल्या यशाचा आनंद साकारण्यासाठी संपूर्ण बॉलिवूड एकत्र आलं होतं. जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा पासून या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची चर्चा सुरु होती. त्यामुळे आता सगळ्यांना सनी देओल आणि दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्या या घोषणेची प्रतीक्षा करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, अमीषा पटेलनं दिग्दर्शक अनिल शर्माविषयी काही आश्चर्यकारक खुलासे केले आहेत. अमीषानं बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखत सांगितलं की 'मी कधीच ऑनस्क्रिन सासू होणार नाही, गदर सारख्या ब्रॅंडसाठी देखील नाही. कोणत्या अभिनेता, निर्माता किंवा मग दिग्दर्शकासाठी देखील नाही. कधीच नाही. अनेकांनी हा प्रश्न देखील केला की 'गदर 2' च्या कोणत्या स्टोरीवर एडिंटींग नाही झाली. तुम्हाला सगळ्यांना माहितीये की तारा आणि सकीनाच्या मुलाला एका मुलीवर प्रेम आहे आणि तिथे जशी परिस्थिती आहे, तिला भारतात आणावं लागत. पण जर तुम्ही नोटीस केलं असेल तर, सकीनाकडून त्याच्या प्रेमाला होकार मिळत नाही. अखेरच्या शॉटमध्ये फक्त तारा सकीना आणि जीतेला एकमेकांना मिठी मारताना दाखवण्यात आलं. मी आईची भूमिका देखील त्यासाठीच साकारली, कारण मला विषयावर विश्वास होता.' त्याशिवाय तिनं हे देखील सांगितलं की तिला आणि सनी देओलला चित्रपटाच्या क्रिएटिव्हमध्ये अनेक अडचणी होत्या. त्यात त्यांनी सुधारणा केली. 



हेही वाचा : अनंत आणि राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंगमध्ये 'असा' होता राजेशाही थाट, तुम्हीही एकदा पाहाच


अमीषा पटेल त्या अभिनेत्रींपैकी एक आहे, जिच्या चित्रपटानं 2023 मध्ये सगळ्यात जास्त कमाई केली. सनी देओलसोबत 'गदर 2' मध्ये दिसल्यानंतर अमीषानं दोन चित्रपटांमध्ये काम केलं. ज्यात 'मिस्ट्री ऑफ द टॅटू' आणि तौबा तेरा जलवा आहे. पण तिचे हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करण्यात अपयशी ठरले. अमीषा सध्या चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावर सक्रिय आहे. दरम्यान, आता 'गदर 3' विषयी लवकर काही अपडेट समोर येणार की नाही याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.