PHOTO : अनंत आणि राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंगमध्ये 'असा' होता राजेशाही थाट, तुम्हीही एकदा पाहाच

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट हे लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. पण त्या आधी अंबानी कुटुंबानं त्यांच्या प्रेमाला साजरा करण्यासाठी खूप मोठं सेलिब्रेशन केलं होतं. याचा अर्थ राधिका आणि अनंत यांच्या प्रेमाचं सेलिब्रेशन सगळ्यांना पाहायला मिळालं. त्या दोघांचा मुंबईत शाही विवाहसोहळा होणार आहे. त्याआधी त्या दोघांचे दोन प्री-वेडिंग सेलिब्रेशन झाले. त्यातील दुसऱ्या प्री-वेडिंगचे फोटो आता समोर आले आहेत. त्यांच्या या फोटोंनी सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 

| Jun 15, 2024, 10:59 AM IST
1/8

इटलीमध्ये झालेल्या या क्रुझ पार्टीत बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्याशिवाय हॉलिवूडचे लोकप्रिय गायकांनी देखील यावेळी हजेरी लावली होती. त्याचे फोटो वोगनं शेअर केले आहेत. 

2/8

समुद्राच्या किनारी असे फूड स्टॉल लावण्यात आले होतेय. त्यावेळी हटके डिश आलेल्या सगळ्या पाहुण्यांना सर्व्ह करण्यात आल्या. तर डिनरसाठी खास सिटिंग अरेन्जमेन्ट करण्यात आल्या होत्या. 

3/8

इटलीच्या डान्सर्सनं केलं अंबानींच्या पाहुण्यांचे मनोरंजन. 

4/8

अभिनेत्रींमध्ये अनन्या पांडे, शनाया कपूर यांच्या लूकनं सगळ्यांची मने जिंकली. तर त्यासोबत जान्हवी कपूर आणि तिचा बॉयफ्रेंड शिखर पहाडियाच्या फोटोनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 

5/8

या कार्यक्रमात हॉलिवूडचे लोकप्रिय गायक आणि डीजे यांनी देखील सगळ्यांची मने जिंकली आहेत. त्यांच्या परफॉर्मन्सच्या वेळचे काही फोटो समोर आले आहेत. 

6/8

राधिका मर्चेंट यावेळी संपूर्ण आनंद घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. तिनं लोकप्रिय गायिका कॅटी पेरीला मिठी मारली आहे. 

7/8

राधिकाच्या आऊटफीटनं देखील सगळ्यांचे लक्ष वेधले. तिचे वेगवेगळ्या आऊटफिटमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

8/8

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या लग्नाविषयी बोलायचे झाले तर 12 जुलै रोजी ते सप्तपदी घेणार आहेत. जियो वर्ल्ड कनवेंशन सेंटरमध्ये लग्नाच्या सगळ्या विधी होणार आहेत. त्यांच्या या लग्नाचा कार्यक्रम हा तीन दिवसांचा असणार आहे. (All Photo Credit : Vogue Instagram/ Social Media)