मुंबई : बॉलिवूडपासून दुरावलेली अभिनेत्री अमिषा पटेल नुकतीच सोशल मीडियात ट्रोल झाली. ‘कहो ना प्यार है’, ‘गदर’ सारखे सुपरहिट सिनेमे देणा-या अमिषाने सोशल मीडियात एक फोटो शेअर केल्याने ती ट्रोल झालीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एखादी सेलिब्रिटी अशाप्रकारे सोशल मीडियात फोटोवरून ट्रोल होणारी ही पहिली घटना नाहीये. अनेक सेलिब्रिटीही याआधी सोशल मीडियात ट्रोलचे शिकार ठरले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, अमिषाने शेअर केलेल्या फोटोवर अनेकांनी अश्लील कमेंट केल्या आहेत. तर काहींनी तिला तिच्या आगामी सिनेमाबाबत विचारणा केली. 




काही कमेंटमध्ये अमिषाला असे फोटो शेअर न करण्याचे सल्लेही देण्यात आले आहेत. इतकेच काय तर एका यूजरने अमिषाला लवकरात लवकर लग्न करण्याचाही सल्ला देऊन टाकला. अमिषाने पहिल्यांदा बोल्ड फोटो शेअर केला असे नाही तर याआधीही तिने अनेक बोल्ड फोटो सोशल मीडियात शेअर केले आहेत. नेहमीच तिच्यावर टीका झालीये. तरी सुद्धा ती बोल्ड फोटो शेअर करण्यास घाबरत नाही.