मुंबई : बॉलिवूड स्टार सनी लिओनीने पॉर्न इंडस्ट्रीतून बॉलिवूडमध्ये येऊन नाव कमावलं आहे. तिने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं याचबरोबर ती अनेक आयटम साँन्ग मध्येही अनेकदा दिसते. त्याचप्रमाणे आता पॉर्न इंडस्ट्रीतून आलेली प्रसिद्ध स्टार मिया मालकोवा हिनेही राम गोपाल वर्मा यांच्या 'क्लायमॅक्स' चित्रपटात काम केलं आहे. आता लवकरच मिया बॉलीवूडमध्ये हात आजमावू शकते, अशी अटकळ बांधली जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिया माल्कोवाच्या सूत भारताशी जोडलेल्या आहेत. तिने राम गोपाल वर्मा यांच्या क्लायमॅक्स चित्रपटात काम केलं आहे. चित्रपटात माल्कोवा पूल आंघोळ करताना आणि रोमान्स करताना दिसत आहे. 'क्लायमॅक्स' हा एक थ्रिलर चित्रपट होता जो 2020 मध्ये आला होता. सिनेमाचा बॅकड्रॉप एक रेगिस्तान होता.


मिया माल्कोवा ही प्रसिद्ध अमेरिकन पॉर्नस्टार आहे. बॉलिवूडमध्ये तिची सनी लिओनीशी स्पर्धा आहे. क्लायमॅक्स रिलीज झाल्यानंतर मिया मालकोवाला बॉलिवूडमध्ये चांगलीच पसंती मिळाली आहे. राम गोपाल वर्माने क्लायमॅक्सच्या आधीच मिया मालकोवासोबत काम केलं आहे. त्यांनी माल्कोवासोबत 'गॉड, सेक्स अँड ट्रुथ'मध्ये काम केलं आहे.



मिया माल्कोवाचा जन्म 1992 मध्ये कॅलिफोर्नियामध्ये झाला होता. माल्कोवा फ्रेंच कॅनेडियन, जर्मन आणि आयरिश पार्श्वभूमीतून येते. मिया माल्कोवा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करते.