आणखी एक गायक कोरोनाच्या विळख्यात
रोज कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.
मुंबई : कोरोना व्हायरसचा फैलाव दिवसागणिक वाढत आहे. रोज कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. तर आता अमेरिकेत एका २५ वर्षीय गायिकेला कोरोनाची लागण झाली आहे. अमेरिकेत आतापर्यंत ३ हजार पेक्षा जास्त रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तर या धोकोदायक विषाणूची लागण तब्बल १ लाख ६३ जणांना झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये कोरोनाचा धोक वाढला आहे. दरम्यान अमेरिकन गायक कॅली शोरला (kalie shorr)देखील कोरोनाची लागण झाली आहे. या धक्कादायक बातमीचा खुलासा खुद्द तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंडच्या माध्यमातून केला आहे.
ती म्हणाली, 'मला देखील कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या ३ आठवड्यांपासून क्वारंटाइनमध्ये आहे. मी कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी फार प्रयत्न केले. आता मला पूर्वीपेक्षा उत्तम वाटत आहे. हा एक पुरावा आहे, की कोरोना किती घातक आहे. तरी देखील लोक या धोकादायक आजाराला गांभिर्याने घेत नाहीत. ही अत्यंत निराशाजनक बाब आहे.' अशा प्रकारे तिने कोरोना झाल्यानंतरचा अनुभव ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला.
त्याचप्रमाणे बॉलिवूड अभिनेत्री कनिका कपूरला दोखील कोरोनाची लागण झाली आहे. तिच्यावर सध्या लखनऊमध्ये उपचार सुरू आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे तिची पाचवी चाचणी देखील पॉझिटिव्ह आली आहे. पण डॉक्टरांनी तिच्या परिस्थित सुधारणा होत असल्याचं सांगितलं आहे.
कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगाचे मोठे नुकसान झाले आहे. या धोकादायक विषाणूची लागण संपूर्ण जगात तब्बल ८ लाख ५८ हजार ८९२ जणांना झाली आहे. तर ४२ हजार १५८ जाणांचा या व्हायरसने बळी घेतला आहे. दिलासादायक बातमी म्हणजे १ लाख ७८ हजार १०० कोरोना बाधित रुग्णांची या आजारातून सुखरूप सुटका झाली आहे.