Loksabha Nivdnuk Nikal 2024 Smriti Irani : आज लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी जाणून घेण्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. अशात सतत काही राजकारण्यांमध्ये आघाडी पिछाडी पाहायला मिळते. अशात सुरुवातीच्या टप्प्यात मोदी सरकारला मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात सगळ्यात मोठा धक्का हा स्मृती इराणी यांच्यामुळे मिळाला आहे. सकाळी 8 वाजे पासून मत मोजनी सुरु झाली आहे. लोकसभा निवडणूकीच्या निकालाची प्रतीक्षा संपायला आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेठीमध्ये स्मृती इरानी जवळपास 90 हजार मतांनी मागे आहे. कॉंग्रेस उमेदवार किशोरी लाल यांनी 90 हजार  479 मतांनी मागे स्मृती यांना मागे दरम्यान, अजूनही त्याची मत मोजणी ही सुरु आहे. अशात स्मृती या पुढे जाणार की मागे राहणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. 



कॉंग्रेसचे प्रतिनिधित्व करण्यासाठी यावेळी माजी राष्ट्रीय सचिव किशोरी लाल शर्मा यांना तिकिट देण्यात आलं होतं. प्रियांका गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत किशोरी लाल शर्मा यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, हे सगळे आकडे पाहता प्रियांका गांधी यांनी त्यांच्या आधीच्या ट्विटर अकाऊंट म्हणजेच आधीच्या X अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये प्रियांका यांनी किशोरी लाल शर्मा यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्या म्हणाल्या, किशोरी दादा, मला तुमच्यावर नेहमीच विश्वास होता. मला आधी पासून ठावूक होतं की तुम्हीच जिंकणार. तुम्हाला आणि अमेठीच्या माझ्या प्रिय बंधू-बघिनींना हार्दिक शुभेच्छा.  


केएल शर्मा म्हणजेच किशोरी लाल शर्मा हे मुळचे लुधियानाचे राहणारे आहेत. गेल्या बऱ्याच काळापासून गांधी कुटुंबांचे जवळचे संबंध होते. अमेठी आणि रायबरेलीमध्ये ते निवडणुकीची रणनीती बनवण्यासाठी आणि निवडणून येण्याचे काम करत आहेत. सोनिया गांधी यांच्यासाठी किशोरी लाल शर्मा हे चाणक्यची भूमिका साकारतात असं म्हटलं जातं. किशोरी लाल शर्मा हे 1983 पासून रायबरेली आणि अमेठी मतदार संघात सक्रिय आहेत.