मुंबई : 'आम्ही बेफिकरे' या मराठी सिनेमातील एक आयटम  सॉन्ग प्रदर्शित करण्यात आले आहे. 'रसगुल्लाबाई' असे या आयटम सॉन्गचे नाव आहे. आतापर्यंत अनेक चॅनेल्सवर व्हिजे म्हणून काम केलेल्या प्रियंका झोमसेने आयटम सॉन्गमध्ये आपली आदाकारी दाखवली आहे आणि आता हे गाणे तरूणांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. नाशिकच्या कडाक्याच्या थंडीत या सॉन्गचे चित्रीकरण पूर्ण करण्यात आले आहे. सिनेमातील गाण्यांना प्रणय अढांगळे यांनी संगीत दिले असून रोहित राऊत, हर्षवर्धन वावरे, किर्ती किल्लेदार आणि सौरभ जोशी यांच्या आवाजात सिनेमातील गाण्यांना स्वरबद्ध करण्यात आले आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



बॉलिवूडमध्ये सध्याच्या काळात अनेक सिनेमांमध्ये आयटम सॉन्ग हमखास असतात आणि आता ही संकल्पना मराठी सिनेमात सुद्धा रूजताना दिसत आहे. शीला, मुन्नी आणि जलेबीबाई अशा अनेक आयटम सॉन्गनंतर आता 'रसगुल्लाबाई' गाण्याने जोर धरला आहे. सोशल मीडियावर या गाण्याने चांगलाच ताल धरला आहे.


दिग्दर्शक कविश्वर मराठे यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. तर सिनेमाची निर्मिती हरिहर फिल्म्सने केली आहे. अनेक मालिका आणि सिनेमांमधून भूमिका बजावणारे सुयोग आणि मिताली सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त सिनेमात राहूल पाटील, स्वप्नील काळे आणि अक्षय हाडके दिसणार आहेत.