TATA कडून लोकप्रिय कारवर घसघशीत सूट; ह्युंडईही पडली मागे, किती कमी रक्कम मोजावी लागतेय माहितीये?

TATA Cars : बजेटची चिंताच नाही... कारण टाटा समुहानं केलाय विचार. कारच्या दरात मिळतेय मोठी सूट. मॉडेल आणि फिचर्स पाहूनच घ्या...   

Nov 19, 2024, 11:37 AM IST

TATA Cars : नव्यानं कार खरेदी करू पाहणाऱ्या अनेकांचीच पहिली पसंती असते ती म्हणजे टाटाच्या कारना. 

1/7

छानशी कार

Tata Altroz Racer Discount Offer latest price updates

TATA Cars : नव्यानं एखादी छानशी कार खरेदी करत कुटुंबासमवेत भटकंतीसाठी निघण्याची स्वप्न अनेकजण पाहतात. त्यातही जर तुमचं कुटुंब 5 जणांचं असेल, तर टाटा समुहाची 'ही' कार तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरेल. 

2/7

सवलत

Tata Altroz Racer Discount Offer latest price updates

सध्या टाटाची ही कार एका मोठ्या सवलतीसह सादर करण्यात येत असून, यामुळं बजेट कोलमडण्याची चिंता राहणार नाही. 7 जून 2024 रोजी भारतीय बाजारात लाँच झालेली आणि आता दणक्यात सूट असणारी ही कार आहे टाटा अल्ट्रोज रेसर. 

3/7

कॅश डिस्काऊंट

Tata Altroz Racer Discount Offer latest price updates

लाँच होण्याच्या पाच महिन्यांनंतर या कारच्या तीन व्हेरिएंट्सवर सूट दिली जात असून, यामध्ये कारची एक्स शोरूम किंमत 9.49 लाखांपासून 10.99 लाख रुपयांपर्यंत असल्याचं सांगितलं जात आहे. या कारवर सध्या 65 हजारांची सूट मिळ असून, कॅश डिस्काऊंट आणि एक्सचेंज बोनस अशाही सुविधा उपलब्ध आहेत. 

4/7

व्हेरिएंट

Tata Altroz Racer Discount Offer latest price updates

 R1, R2 आणि R3 अशा तीन व्हेरिएंटमध्ये असणाऱ्या या कारच्या टॉप स्पेक व्हेरिएंटमध्ये वेंटिलेटेड फ्रंट सीट्स, एक 360-डिग्री कॅमेरा, ब्लाईंड स्पॉट मॉनिटरिंग फिचर देण्यात आलं आहे. 

5/7

टर्बो-पेट्रोल इंजिन

Tata Altroz Racer Discount Offer latest price updates

1.2-लीटर, 3-सिलेंडर, टर्बो-पेट्रोल इंजिन असणाऱ्या या कारमधून 120 एचपी इतकी पॉवर जनरेट होते. कारचं स्टँडर्ड मॅन्युअल 6 स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्ससह उपलब्ध आहे. 

6/7

ह्युंडई i20 N ला टक्कर

Tata Altroz Racer Discount Offer latest price updates

टाटाची ही कार सध्या थेट ह्युंडई i20 N ला टक्कर देते. ह्युंडईच्या या कारमध्ये 1.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन असून, या कारमध्ये मॅन्युअल, ड्युअल क्लच ऑटो गिअरबॉक्सचा पर्यायही उपलब्ध आहे. 

7/7

ह्युंडईशीच तुलना

Tata Altroz Racer Discount Offer latest price updates

ह्युंडईशीच तुलना करायची झाल्यास i20 N ची एक्स शोरुम किंमत 10 लाख ते 11.42 लाखांदरम्यान आहे. तर, कारच्या ऑटोमॅटिक व्हेरिएंटची किंमत 11.15 लाख ते 12.52 लाख रुपये इतकी असल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळं टाटाची अल्ट्रोज रेसर चांगल्या फिचरसह किंमतीच्या बाबतीतही निराशा करत नाही हेच स्पष्ट होत आहे.