Zakir Hussain Health Update: झाकीर हुसेन यांचे वयाच्या 73 व्या वर्षी निधन - पीटीआय
Zakir Husain Death: झाकीर हुसेन यांची बहीण खुर्शीद औलिया यांनी आपल्या भावाच्या मृत्यूचे वृत्त चुकीचे असल्याचे म्हटले होते. परंतु आता त्यांनी झाकीर हुसेन यांचे निधन झाल्याचे सांगितले आहे.
Zakir Hussain: जगप्रसिद्ध तबलावादक आणि संगीतकार उस्ताद झाकीर हुसेन यांचे वयाच्या 73 व्या वर्षी निधन झाल्याचे वृत्त रविवारी रात्री उशिराने आले. परंतु हे वृत्त चुकीचे असल्याचे आणि ते जिवंत असल्याचे त्यांची बहिणीने सांगितले होते. आता सोमवारी सकाळी त्यांच्या मृत्यूची बातमी आली. त्यांनी वयाच्या 73 वर्षी त्यांनी सॅन फ्रान्सिस्कोच्या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. झाकीर हुसेन हे काही दिवसांपासून गंभीर आजाराने ग्रासले होते. त्यांच्यावर अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे उपचारही सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. परंतु हे वृत्त खोटं असल्याचे त्यांची बहीण खुर्शीद औलिया यांनी रविवारी रात्री उशिरा सांगितले होते. पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांना सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना दोन आठवड्यांपूर्वी हृदयाशी संबंधित समस्यांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सॅन फ्रान्सिस्कोच्या रुग्णालयात उपचार
झाकीर हुसेन यांच्या मॅनेजर निर्मला बचानी यांनी सांगितले की, " त्यांना रक्तदाबाच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. " त्याच्या मृत्यूचा दावा करणाऱ्या वृत्तांदरम्यान, त्यांच्या मॅनेजरने पीटीआयला कंफर्म केले की हुसैन यांच्यावर सॅन फ्रान्सिस्कोच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि त्यांचा मृत्यू झाला नाही. हुसेन यांची बहीण खुर्शीद यांनी सांगितले की, " माझ्या भावाची प्रकृती गंभीर आहे पण सध्या तो श्वासोच्छ्वास घेत आहे. झाकीर लवकर बरा व्हावा यासाठी आम्ही भारतातील आणि जगभरातील त्याच्या चाहत्यांना प्रार्थना करण्याचे आवाहन करतो." यःशिवाय त्यांनी माध्यमांना विनंतीही केली आहे. "मी सर्व माध्यमांना विनंती करू इच्छिते की झाकीरच्या निधनाबाबत चुकीच्या माहितीकडे लक्ष देऊ नये. सोशल मीडियावर ही सर्व माहिती पाहून मला खूप वाईट वाटत आहे. हे अत्यंत चुकीचे आहे."
परंतु आता हुसेन यांच्या कुटुंबानेच सोमवारी त्यांचे निधन झाल्याची माहीती दिली आहे.
झाकीर हुसेन यांना पद्मभूषण पुरस्कार
उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च १९५१ रोजी मुंबईत झाला. झाकीर यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी तबला वाजवायला शिकायला सुरुवात केली. झाकीर यांना 1988 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण आणि गेल्या वर्षी पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचा झेंडा जगभर फडकवला आहे. त्यांनी प्रतिष्टीत पाच ग्रॅमी पुरस्कार जिंकून भारतीय शास्त्रीय संगीताचा झेंडा जगभर फडकवला.