महाराष्ट्रातील सर्वात लहान अणि मनमोहक रेल्वे मार्ग; इथं फक्त एकच ट्रेन धावते

महाराष्ट्रातील सर्वात लहान अणि मनमोहक रेल्वे मार्ग;  इथं फक्त एकच ट्रेन धावते

Dec 15, 2024, 22:21 PM IST

Matheran Hill Railway : महाराष्ट्राचे अनेक जिल्हे रेल्वेने जोडले आहे. यामुळे प्रवास जलद झाला आहे. मात्र, महाराष्ट्रात एक असा रेल्वे मार्ग आहे जो जलद नसला तरी अतिशय सुंदर आहे. हा रेल्वे मार्ग महाराष्ट्रातील सर्वात लोप्रिय आणि देशातील सर्वात लहान हिल स्टेशनला जोडणारा आहे.  आयुष्यात एकदा तरी या स्वर्ग सफरीचा अनुभव नक्की घ्या.

1/7

महाराष्ट्रातील हा छोटासा रेल्वे मार्ग पर्यकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. अनेकांना या अनोख्या ट्रेनमधून सफर करण्याची इच्छा असते. 

2/7

 या टॉय ट्रेनमधून प्रवास करताना हिरवेगार डोंगर, डोंगरातून कोसळणारे धबधबे असे विहंगम दृष्य पहायला मिळते.    

3/7

नेरळ-माथेरान लाइट रेल्वेने 1907 मध्ये स्टीम इंजिनद्वारे चालवलेल्या पहिल्या टॉयट्रेनला UNESCO द्वारे जागतिक वारसा म्हणून पुरस्कृत केले गेले आहे.

4/7

नेरळ स्थानकातून या टॉय ट्रेनचा प्रवास सुरु होतो. जुम्मापट्टी, वॉटर पाईप, अमन लॉज या स्थानकावर थांबा घेत माथेरान स्थानकात या टॉय ट्रेनचा प्रवास संपतो. 

5/7

सह्याद्री पर्वतरांगेमधून वाट काढत ही माथेरानची राणी प्रवास करते. ही रेल्वे नेरळ ते माथेरान दरम्यानचे 21 किमी अंतर सुमारे 2 तास 20 मिनिटांमध्ये पार करते.

6/7

मध्ये रेल्वेच्या  नेरळ स्थानकापासून नेरळ−माथेरान टॉयट्रेनचा प्रवास सुरु होतो.

7/7

नेरळ माथेरान हा महाराष्ट्रातील सर्वात सुंदर रेल्वे मार्ग आहे. या मार्गावर माथेरानची राणी या नावाने ओखळली जाणारी टॉय ट्रेन धावते.