मुंबई : आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमधून मल्याळी चित्रपट ''एस दुर्गा' आणि 'न्यूड'ला हटविण्यात आले. त्यामुळे नाराज झालेल्या फिल्ममेकर सुजॉय घोष यांनी आपल्या ज्यूरी हेड पदाचा राजीनामा दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोव्यामध्ये 20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत हा फिल्म फेस्टीव्हल पार पडणार आहे. या फेस्टीव्हलचे यंदाचे 48 वे वर्ष आहे. एकूण 13 सदस्यांच्या ज्यूरी कमेटीने फेस्टिव्हलमध्ये दाखविण्यात येणाऱ्या चित्रपटांची निवड केली होती. यात ''एस दुर्गा' आणि 'न्यूड' या चित्रपटांचाही समावेश होता. मात्र, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आपल्या शेवटच्या निवड फेरीत या दोन्ही चित्रपटांना वगळले.


'मला काहीच बोलायचे नाही'


दरम्यान, या प्रकारनंतर नाराज झालेल्या सुजॉय घोष यांनी आपल्या ज्यूरी हेड पदाचा राजीनामा दिला. त्यांनंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. मात्र, चित्रपटांना हटवल्याबद्दल आपण नाराज आहोत. म्हणून आपण राजीनामा दिला आहे. पण, सध्या या वादावर आपल्याला काही बोलायचे नाही, असे मत सुजॉय घोष यांनी व्यक्त केले आहे.


मंत्रालयाच्या निर्णयाला निवड समितीचा विरोध


दरम्यान, मंत्रालयाने अशा प्रकारे चित्रपटांना वगळल्याबद्धल निवडसमितिने विरोध दर्शवला आहे. मंत्रालयाने उचललेले हे पाऊल म्हणजे धक्कादायक आणि तितकेच वेदनादाई असल्याचे मत काही सदस्यांनी व्यक्त केले.


''एस दुर्गा'चे दिग्दर्शक म्हणाले...


''एस दुर्गा' आणि 'न्यूड' या चित्रपटांच्या दिग्दर्शकांनी पीटीआ या वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रीयेत म्हटले आहे, आम्ही मंत्रालयाच्या या निर्णयाने प्रचंड निराश आणि आश्चर्यचकित झालो आहोत. ''एस दुर्गा'चे दिग्दर्शक सनल कुमार शशिधरण यांनी म्हटले की, मंत्रालयाच्या या निर्णयाविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत.