मुंबई : बीग बी अमिताभ बच्चन यांच्या आईचा तेजी बच्चन यांची गुरूवारी १० वी पुण्यतिथी होती. त्यावेळेस ते आईच्या आठवणीत भावुक झाले.


काय म्हणाले अमिताभ ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये त्यांच्या शेवटच्या क्षणांना आठवून त्यांनी लिहीले की, आईसाठी ती सकाळी काहीशी कठीण होती. तिच्या हृदयाची गती सुरळीत नव्हती. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केली. मात्र तिच्या कमजोर शरीरातील हृदय हळूहळू उत्तर देत होते.


त्यांनी सांगितले की, मॅन्युअली पम्पिंग सुरू केले आहे. तिच्यासाठी ते खूप कठीण होते. आम्ही एकमेकांचा हात पकडला होता.



वयाच्या ९३ व्या वर्षी तेजी बच्चन यांचे निधन झाले.


ती सुंदर...


आईबद्दल व्यक्त होताना अमिताभ यांनी लिहीले की, ''ती जगात सर्वात सुंदर होती.''