अमिताभ बच्चन यांचा 11 ऑक्टोबर रोजी 82 वा वाढदिवस. भारतीय सिनेसृष्टील सगळ्यात मोठा सुपरस्टार म्हणून बिग बींकडे पाहिल जातं. पण ही उंची गाठण्यासाठी अमिताभ यांना भरपूर स्ट्रगल करावा लागला होती. अमिताभ यांचं जस वय वाढतंय तसाच त्यांच्या चाहत्यांचा आकडा देखील वाढत आहे. अमिताभ यांचा फक्त चाहत्यांचा आकडा मोठा आहे असं नाही तर त्यांच्या संपत्तीचा आकडा देखील दिवसेंदिवस वाढत आहे. आज अमिताभ यांच्या नावावर अगणित संपत्ती असली तरीही एकवेळ अशी होती जेव्हा त्यांना रस्त्यावर उंदरांसोबत रात्र काढायला लागत होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमिताभ बच्चन यांचा सुरुवातीच्या काळात जाहिरात करण्याच्या पूर्णपणे विरोधात होते. तेव्हा त्यांना फक्त अभिनेता व्हायच होतं. तेव्हा त्यांच्याकडे काम नव्हतं पण त्यांना जाहिरातही करायची नव्हती. तेव्हा त्यांनी चक्क 10000 रुपयांची कंपनी देखील नाकारली होती. 


यासोबत 1999 च्या मुलाखतीत अमिताभ बच्चन यांनी आपल्या करिअरचा सुरुवातीचा कठीण काळ आठवला. याकाळात त्यांनी कस स्वतःला सांभाळला. जेव्हा त्यांच्यावर एबीसीएल कंपनीमुळे कठीण प्रसंग ओठावला होता. तेव्हा त्यांनी जाहिराती करायला सुरुवात केली. बच्चन यांनी सांगितलं की, 1960 दशकांत जेव्हा त्यांच्याकडे काम नव्हतं तेव्हा त्यांच्या मनात विचार आला की, ड्रायव्हिंग लायसन्स घेऊन आपण एक ड्रायव्हर म्हणून काम करावं. 



बिग बी सांगतात की, मी फक्त ड्रायव्हिंग लायसन्स हातात घेऊन मुंबईत आलो होतो. जर मी अभिनेता झालो नसतो तर मी चालक नक्कीच झालो असतो, असं तो म्हणतो. एकेकाळी अमिताभ यांच्यावर मरीन ड्राईव्हवर झोपण्याची वेळ आली होती. 'माझ्याकडे झोपण्यासाठी जागा देखील नव्हती. मित्र परिवारांकडे तुम्ही थोड्या वेळासाठीच राहू शकतो. अशावेळी मी मरीन ड्राईव्हला उंदरांच्यासोबतीने बराच काळ काढला.'


आता एवढ्या कोटींची संपत्ती 


एकेकाळी मरीन ड्राईव्हला रात्र काढलेले अमिताभ बच्चन आज मेहनतीच्या जोरावर कोट्याधीश आहेत. जलसा, प्रतीक्षा, जनक, वत्स सारखे आलिशान बंगले आहेत. जया बच्चन यांनी राज्यसभा निवडणुकीच्यावेळी आपली संपत्ती जाहीर केली होती. यावेळी त्यांनी आपल्यासोबतच अमिताभ बच्चन यांची संपत्ती देखील जाहिर केली. 2,73,74,590 रुपये एवढी संपत्ती नोंदवली असून अमिताभ बच्चन यांच्या अकाऊंटमध्ये बॅलेन्स 120,45,62,083 रुपये इतकी आहे. अमिताभ बच्चन यांच्याकडे 54.77 कोटींची ज्वेलरी तर 16 गाड्या आहेत.