मुंबई : ७० आणि ८० च्या दशकात अमिताभ बच्चन यांची भूमिका साकारणारा बालकलाकार आता काय करतो हे तुम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल.


अनेक सिनेमांमध्ये साकारली अभिताभ यांची भूमिका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक चित्रपटांमध्ये मयूर राज वर्मा यांनी अमिताभ यांच्या बालपणाची भूमिका साकारली होती. यानंतर मयुरला यंग अमिताभ बच्चन म्हणून देखील ओळखलं जावू लागलं. त्या काळात मयुर सर्वाधिक पैसे चार्ज करणारा बालकलाकार बनला होता.


बऱ्याच सिनेमांमध्ये मयुर यांनी अमिताभ बच्चन यांच्या बालपणाची भूमिका साकरली आहे. मुकद्दर का सिकंदर हा त्यांचा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. यामुळे मयुर एका रात्रीत स्टार बनले.


आता वेल्समधले सुप्रसिद्ध व्यापारी


मयूर राज वर्मा आजकाल वेल्समध्ये आहेत. त्यांना दोन मुले आहेत. मयुर हे वेल्सचे सुप्रसिद्ध व्यापारी आहेत. तिथे ते आपल्या पत्नीसोबत इंडियाना रेस्टॉरंट चालवत आहेत. त्यांची पत्नी एक प्रसिद्ध शेफ आहे.