मुंबई : राजकुमार राव प्रमुख भूमिकेत असलेला  'न्यूटन' चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदा या चित्रपटाची ‘ऑस्कर’ पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपटांच्या विभागासाठी भारताकडून निवड करण्यात आली आहे. 
'न्यूटन' चित्रपटाबाबत झालेल्या या घोषणेनंतर बॉलिवूड कलाकारांनीही राजकुमार राव सोबतच या चित्रपटातील कलाकारांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. 


बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन, अनिल कपूर समवेत अनेक मान्यवरांनी 'न्यूटन' चित्रपटाच्या कलाकारांचे कौतुक केले आहे. 






 ‘भारताकडून ऑस्करसाठी ‘न्यूटन’ला प्रवेशिका मिळाली. कित्येक वर्षांनंतर फिल्म फेडरेशननं चांगला निर्णय घेतला.’अशा शब्दांत हंसल मेहता यांनी कौतुक केले. 


 अमित मसूरकर या मराठमोळ्या तरूणाने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. छत्तीसगडच्या नक्षलवादी परिसरात काम करणाऱ्या एका आदर्शवादी कर्मचाऱ्याची कहाणी आणि सोबतीला राजकीय पार्श्वभूमी या चित्रपटात रंगवण्यात आली आहे.