मुंबई : अमिताभ बच्चन आणि अभिनेता ऋषी कपूर यांची जोडी तब्बल 27 वर्षानंतर पुन्हा एकदा पडद्यावर येत आहे. दोघेही लवकरट '102 नॉट आऊट' या सिनेमाच्या माध्यमातून आपल्या भेटीला येत आहे. अमर अकबर अॅनथनी या सिनेमांत एकमेकांचा भाऊ असलेले हे दोघं या सिनेमांत बाप- लेकाची भूमिका साकारत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमिताभ बच्चन या सिनेमांत बापाची भूमिका करत असून ऋषी कपूर त्यांच्या मुलाची भूमिका साकारत आहे. काही वेळापूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमांतील बिग बी यांचा अंदाज तुम्हाला नक्की आवडेल. 



या सिनेमांत बिग बी 102 वर्षाच्या वडिलांची भूमिका साकारत आहेत. तर ऋषी कपूर 75 वर्षाच्या मुलाची. या ट्रेलरमध्ये आहे की, जगातील हा पहिला वडिल असेल जो आपल्या 75 वर्षाच्या मुलाला वृद्धाश्रमात पाठवत आहेत. ओ माय गॉड सारख्या सिनेमांच दिग्दर्शन करणाऱ्या उमेश शुक्ला यांचा हा सिनेमा आहे. यांनी या सुपरस्टार जोडीला तब्बल 27 वर्षांनी एकत्र आणलं आहे. अमिताभ बच्चन आता जोधपुर वरून नुकतेच मुंबईत आले आहे. 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' या सिनेमाचं शुटिंग बिग बी करत आहेत. पहिल्यांदा बिग बी या सिनेमांत आमिर खानसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.