Kabhie Khusi Kabhie Gham: शाहरूख खान आणि अमिताभ बच्चन यांच्यात फार खास नातं आहे. त्यांच्याकडे एक मोठा पॅलेस आहे... तुम्हाला माहितीये? हो... याच पॅलेसमध्ये शाहरूख खान थेट हॅलिकॉप्टरमधून उतरतो. इतका मोठा पॅलेस आहे एका खास जगातील श्रीमंत परिवाराचा. परंतु त्यात अमिताभ बच्चन आणि शाहरूख खान यांचाही वाटा आहे? या वरील स्पष्टीकरणावरून कदाचित तुम्हालाही काहीसे असेच वाटेल. श्रीमंत अभिनेत्यांकडे असा कुणाच्या पॅलेसचा वाटा असेल यात काही नवीन नाही हे ऐकून तुम्हालाही तेच वाटेल. परंतु येथे थोडा ट्विट्स आहे. 2001 साली आलेला 'कभी कुशी कभी गम' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यामुळे या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. या चित्रपटात तुम्ही एक मोठा पॅलेस पाहिलाच असेल. जो अमिताभ बच्चन यांचा होता. म्हणजेच रायचंद कुटुंबियांचा होता. परंतु तुम्हाला माहितीये का की हा पॅलेस एका मोठ्या श्रीमंत परिवाराचा आहे, जी जगातील सर्वात श्रीमंत फॅमिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपटात हा पॅलेस रायचंद कुटुंबाचा होता परंतु वास्तवात हा पॅलेस एका इंग्लंडमधील अतिउच्चभ्रु आणि श्रीमंत फॅमिलीचा आहे. इंग्लंडमधील रॉथ्सचाईल्स नावाच्या श्रीमंत कुटुंबियांचा हा पॅलेस आहे. आज या लेखातून आपण या पॅलेसबद्दल जाणून घेणार आहोत. या पॅलेसचं नावं आहे. वाडेस्टडन मॅनेर असं या पॅलेसचं नावं आहे. बॅरोन फरडियन्ड डे रॉथ्सचाईल्ड यांच्यासाठी हे घर बांधण्यात आले होते. डिएनएनं आपल्या एका वृत्तानं म्हटलं आहे की, 1874 ते 1899 मध्ये हे घरं बांधण्यात आले होते. नंतर हे घर पब्लिक इमारत म्हणून जाहीर झाली. त्याचसोबतच याची रचना म्यूझियम प्रमाणेही होती. त्यानंतर येथे चित्रपट आणि शुटिंगसाठी परवानगी मिळायला सुरूवात झाली. नॅशनल ब्रिटिश ट्रस्टकडे हे घर आहे. 


समोर आलेल्या माहितीनुसार, या परिवाराकडे 300 बिलियन डॉलर इतकी संपत्ती आहे. त्यामुळे याची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. कभी खुशी कभी गम हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरला होता. यावेळी करण जोहरनं बिग बजेट चित्रपटाची ओळख करून दिली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज या चित्रपटाला 22 वर्षे झाली असली तरी आजही हा चित्रपट लोकप्रिय ठरला आहे. मध्यंतरी या चित्रपटाला वीस वर्षे पुर्ण झाली तेव्हा सोशल मीडियावरही या चित्रपटाचे अनेक व्हिडीओ हे व्हायरल झाले होते. 


हेही वाचा : दोनदा दहावी नापास पण पदरी इतरांना लाजवेल असं यश! Nagraj Manjule यांचा प्रेरणादायी प्रवास


या चित्रपटातून अमिताभ बच्चन, जया बच्चन, काजोल, करीना कपूर, हृतिक रोशन यांची मांदियाळी होती. या चित्रपटातील गाणीही खूप लोकप्रिय ठरली होती. त्यातून फॅमिली मेलोड्रामा म्हणून हा चित्रपट अनेकदा ट्रोलही झाला आहे.