मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एका मराठी सिनेमाचं कौतुक केलं आहे. हा सिनेमा नव्याने दिग्दर्शित होऊ घातलेल्या अभिनेता पुष्कर श्रोत्रीचा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"उबुंटु" असं या सिनेमाचं नाव  असून १५ सप्टेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. अभिनेता म्हणून आपण पुष्कर श्रोत्रीला अनेकदा आपल्याला भेटलो आहे. पण आता आपण त्याला दिग्दर्शक आणि निर्मात्याच्या भूमिकेत या सिनेमांत पाहणार आहोत. शाळेत शिकलेलं उपयोगाला येतंच... अशी टॅग लाईन असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर बिग बींना भावला आहे. त्यांनी सोशल मीडियावर याचा ट्रेलर शेअर करताना म्हटलं आहे की, भारतामध्ये जे सिनेमे तयार होतात त्यांचे वेगळेपण म्हणजे त्याची कथा. 


पुष्कर श्रोत्रीने आपल्या पहिल्या वहिल्या दिग्दर्शनासाठी शिक्षण हा मुद्दा घेतला आहे. आतापर्यंत मराठीमध्ये अनेक सिनेमे या विषयावर झाले. मात्र या सिनेमाचा ट्रेलर यात नक्कीच काहीतरी वेगळं आहे हा विश्वास देऊन जातो. या सिनेमांत आपल्याला सारंग साठे मास्तराच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचप्रमाणे शाळेत असलेले विद्यार्थी देखील धम्माल करतील यात काही शंका नाही. 



‘स्वरूप रिक्रिएशन’ प्रस्तुत, ‘फेबल फॅक्टरी’ निर्मित‘उबुंटू’ या चित्रपटाद्वारे अभिनेता पुष्कर श्रोत्री चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. आगळेवेगळे नाव असलेल्या या चित्रपटाचे आकाश पेंढारकर, सचिन नारकर आणि विकास पवार हे प्रस्तुतकर्ते असून शालिनी लक्ष्मण घोलप आणि ऑल इज वेल प्रॉडक्शनने सहनिर्मिती केली आहे.