...म्हणून बिग बींनी मागीतली चाहत्यांची माफी
बिग बींचे चाहते त्यांची एक झलक पाहाण्यासाठी कायम उत्सुक असतात.
मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांची माफी मागीतली आहे. बिग बींचे चाहते त्यांना भेटण्यासाठी, त्यांची एक झलक पाहाण्यासाठी नेहमीच आतूर असतात. त्यासाठी बिग बींच्या राहत्या घराबाहेर चाहत्यांची एकच गर्दी जमलेली असते. पण यंदाच्या रवीवारी मात्र ते चाहत्यांना भेटण्यासाठी घरा बाहेर आले नाही.
त्यामुळे बिग बींनी चाहत्यांची माफी मागीतली आहे. तरी बच्चन यांनी यंदाच्या रवीवारी घरा बाहेर न येण्याचे आवाहन केले होते. परंतु त्यांनी नकार दिल्यानंतर सुद्धा आपल्या लाडक्या कलाकाराला पाहाण्यासाठी चाहत्यांनी त्यांच्या घरा बाहेर हजेरी लावली होती.
सोशल मीडियाच्या माध्यमातून बिग बींनी चाहत्यांची माफी मागीतली आहे. ट्विटरवर चाहत्यांचे फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये 'नकार देवूनही चाहते मला भेटण्यासाठी आले. मी सर्वांची माफी मगतो. कारण मी बाहेर येवू शकलो नाही' असे त्यांनी लिहिले आहे.
अमिताभ बच्चन यांना मंगळवारी मध्यरात्री मुंबईच्या नानावटी रूग्णालयात गुपचूप भर्ती करण्यात आलं. त्यांना नेमकं का रूग्णालयात दाखल करण्यात आलं हा प्रश्न सगळ्यांना पडला होता. अमिताभ बच्चन यांना लिवरशी संबंधीत त्रास आहे. त्यामुळे ३ दिवस त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं.