Amitabh Bachchan Gandhi Story : बॉलिवूडचा महानायक, एंग्री यंगमॅन, बिग बी म्हणजे आपले अमिताभ बच्चन हे आज 82 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. 11 ऑक्टोबर 1942 ला प्रसिद्ध लेखक हरिवंश राय बच्चन आणि तेजी बच्चन यांच्या घरी अमिताभ यांचा जन्म झाला. हरिवंश यांनी त्यांचं नाव इंकलाब ठेवलं होतं. एवढंच नाही त्यांच आडनाव हे श्रीवास्तव होतं. तर हरिवंशराय हे बच्चन या नावाने लिखाण करायचं पुढे जाऊन त्यांचं आडनाव बच्चन झालं. तर प्रसिद्ध लेख सुमित्रानंदन पंत हे हरिवंशराय यांच्याकडे आले आणि त्यांनी बिग बींचं नाव इंकलाब बदलून अमिताभ ठेवलं. अमिताभ याचा अर्थ अत्यंत तेजस्वी आणि गुणवान असा होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फार कमी लोकांना माहितीय की, अमिताभ बच्चन, राजीव गांधी आणि संजय गांधी एकत्र लहानचे मोठे झाले. कारण अमिताभ बच्चन यांची आई तेजी बच्चन या इंदिरा गांधी यांच्या जिवलग मैत्रीण होत्या. एवढंच नाही तर इंदिरा गांधी या बिग बी यांना तिसरा मुलगा मानायच्या. पण त्या एका गोष्टीमुळे बच्चन आणि गांधी कुटुंबात दुरावा आला. 



बालपणीच्या मित्रासाठी बिग बी राजकारणात


1984 मध्ये इंदिरा गांधी यांची हत्या झाली, त्यानंतर तडकाफडकी राजीव गांधी यांच्यावर पंतप्रधान पदाची जबाबदारी आली. मग त्यावेळी बालपणीचा मित्र आणि बॉलिवूड सेलिब्रिटी अमिताभ बच्चन यांना राजीव गांधींनी राजकारण यांचा प्रस्ताव ठेवा. मित्रासाठी बिग बी यांनीही तो स्विकारला.



त्यानंतर त्यांनी अलाहाबादमधून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री हेमवती नंदन बहुगुणा यांच्या विरोधात लोकसभेसाठी अर्ज भरला. त्यावेळी लोकसभेत प्रचारात बहुगुणा यांनी बिग बी यांची नाचनिया म्हणून खिल्ली उडवली. 



राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांचं लग्न हे तेजा बच्चन यांच्यामुळे झालं असं मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं. गांधी घराण्यातील प्रत्येक सुख दु:खात बच्चन कुटुंब हजर असायचं. पण आज गांधी कुटुंबातील कोणत्याही प्रसंगात बच्चन कुटुंब तिथे नसतं. मीडिया रिपोर्टनुसार या दोन कुटुंबातील दुरावा हा बोफार्स घोटाळा ठरला.



असं म्हणतात की अमिताभ बच्चन यांचं नाव जाणूनबुजून त्या अडकवण्यात आलं होतं. त्यानंतर अमिताभ बच्चन यांच्या करिअरसोबत आयुष्यात भकूंप आला आणि त्यांनी राजकारणासोबत गांधी कुटुंबापासून आपलं नातं तोडलं. 


'या' व्यक्तीमुळे अमिताभ बच्चन झाले कर्जमुक्त 


अमिताभ बच्चन यांचा आणखी एक जवळचे मित्र म्हणजे अमर सिंग (Amar Singh). काँग्रेस (Congress) पक्षातून राजकारणात प्रवेश केलेले अमिताभ बच्चन यांना सर्वच पक्षांचे लोक मान देतात, परंतु मुलायमसिंह यादव यांच्या समाजवादी पक्षाशी (एसपी) त्यांचं सखोल संबंध होते. अमिताभ बच्चन यांना अखिलेश यादव (Akhilesh Yadav) सरकारच्या अनेक मोहिमांचा चेहरा बनवण्यात आलं होतं.



समाजवादी पक्ष आणि अमिताभ बच्चन यांचं संबंध केवळ जाहिरातींपुरते मर्यादित होते. अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड (Amitabh Bachchan Corporation Limited)(ABCL) मुळे दिवाळखोरीत निघालेल्या बिग बी यांना अमर सिंह यांनी तारलं होतं. अमर सिंह यांच्यामुळेच अमिताभ यांना 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) या रिअॅलिटी शोमध्ये अँकरची संधी मिळाली आणि बिग बी आपलं कर्ज फेडू शकले. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पुन्हा मजबूत झाली.