महागड्या तिकीटांना `गुड बाय`! आता इतक्या स्वस्तात पाहता येणार `हा` सिनेमा
बीग बी अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त इतक्या स्वस्तात पाहता येणार सिनेमा, तिकिटाची किंमत माहितीय का?
मुंबई : बॉलिवूडचा शहनशाह बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा येत्या 11 ऑक्टोंबरला 80 वा वाढदिवस साजरा होणार आहे. या वाढदिवसानिमित्त चित्रपटप्रेमींना त्यांनी मोठं गिफ्ट दिलं आहे. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan Birthday) यांच्या वाढदिवसानिमित्त चित्रपटप्रेमींना स्वस्तात चित्रपट पाहता येणार आहे. त्यामुळे चित्रपटप्रेमींना एक दिवसासाठी का असेना महागड्या तिकिटांपासून दिलासा मिळणार आहे.
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांचा 'गुड बाय' (Good Bye) चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाला समीक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, येत्या 11 ऑक्टोबरला अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस असून ते 80 वर्षांचे होणार आहेत. या वाढदिवसानिमित्त गुड बायचे निर्माते प्रेक्षकांना खास भेट देण्याची तयारी करत आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, येत्या 11 ऑक्टोबरला बिग बी 80 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. या वाढदिवसानिमित्त गुडबाय (Good Bye) चित्रपटाचे निर्माते देशभरात 80 रुपयांना तिकीट विकण्याची तयारी करत आहेत. मात्र, अद्याप याबाबत अधिकृत वृत्त समोर आलेले नाही.असे झाले तर तुम्ही कोणत्याही थिएटरमध्ये जाऊन अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांचा 'गुड बाय' (Good Bye) चित्रपट फक्त 80 रुपयांचे तिकीट खरेदी करून पाहू शकता.
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांचा 'गुडबाय' चित्रपट 7 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला होता. या फॅमिली ड्रामा सिनेमाची पहिल्या दिवशीची कमाई काही विशेष झाली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाने दुसऱ्या दिवशी1.5 कोटींची कमाई केली आहे.
दरम्यान जर अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा हा सिनेमा फॅन्सना 80 रूपयात पाहता आला तर, नक्कीच हे फॅन्ससाठी वाढदिवसानिमित्त मोठं गिफ्ट असणार आहे.