मुंबई : 'मेगास्टार' अमिताभ बच्चन यांनी आपल्या अभिनयाने आणि दमदार आवाजामुळे जगभरात करोडो चाहते निर्माण केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लहान मुलं असोत, किंवा ज्येष्ठ व्यक्ती असोत, महिला असोत, की पुरुष असोत, सगळ्यांनीच बिग बींना मोठ्या पडद्यावर अभिनय करताना पाहिले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन असणाऱ्या कलाकारांच्या यादीत त्यांचा समावेश होतो.


मात्र, एक वेळ अशी आली की त्याच्याकडे पैशांची कमतरता होती.सुपरस्टार झाल्यानंतर आणि करिअरमध्ये खूप काही मिळवल्यानंतर त्यांना वाईट दिवस पाहावे लागले हे आश्चर्यकारकच आहे.


अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबाच्या वाईट काळाबद्दल एका मुलाखतीत अभिषेक बच्चनने सांगितले की, त्यावेळी त्यांच्या वडिलांकडे कुटुंबातील सदस्यांचे पोट भरण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळे कर्मचार्‍यांकडे पैसे मागूनही त्यांनी आम्हाला सांभाळलं आहे. 


त्यावेळी अभिषेक बॉस्टनमध्ये अभिनयाचं शिक्षण घेत होता. मात्र घरच्यांची अशी अवस्था कळताच त्याने कॉलेज अर्धवट सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी आपल्या वडिलांना आपली जास्त गरज असल्याचे अभिषेकला जाणवल्याचं बोललं जातं.


तो काही करू शकला नसला तरी वडिलांना आधार देण्यासाठी तो बॉस्टनहून भारतात परतला. अमिताभ बच्चन यांनी 90 च्या दशकात ABCL ची सुरुवात केली. पण ही कंपनी बुडाली. अमिताभही कर्जात बुडाले आणि त्यांची आर्थिक स्थितीही ढासळली.


पण, 'मोहब्बतें' आणि 'कौन बनेगा करोडपती' यामुळे पुन्हा सगळं सुरळीत झालं. सध्याच्या काळात अमिताभ बच्चन त्यांच्या आगामी 'झुंड' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. याशिवाय 'ब्रह्मास्त्र'मध्ये ते रणबीर कपूर, आलिया भट्ट, मौनी रॉय आणि नागार्जुनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.