शाहरुख-सुहानाच्या चित्रपटात अभिषकची एन्ट्री? अभिषेक बच्चन यांची पोस्ट व्हायरल
शाहरुख आणि सुहाना खानच्या `किंग` चित्रपटात अभिषेक बच्चन खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याची बातमी समोर येत आहे. मात्र, सध्या प्रेक्षक या बातमीची पुष्टी होण्याची वाट पाहत आहे. दरम्यान बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चनचे वडील अभिषेक बच्चन यांच्या एका पोस्टने सोशल मीडिया सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
Shahrukh-Suhana : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी' या चित्रपटांच्या प्रसिद्धीमधून हॅटट्रिक केली होती. 4 वर्षांनंतर शाहरुखच्या या पराक्रमाला हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठं कमबॅक म्हटलं गेलं आहे. शाहरुखच्या प्रचंड यशाचा त्याच्या चाहत्यांनी देखील आनंद साजरा केला. आता चाहते शाहरुखच्या पुढच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
शाहरुख खानने अजून त्याच्या पुढच्या प्रोजेक्ट विषयी अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, सुहाना खानसोबत शाहरुख एका प्रोजेक्टवर काम करत असल्याच्या बातम्या आल्या आहेत. या प्रोजेक्ट संबंधित एक बातमी समोर आली आहे. जी चाहत्यांची उत्सुकता वाढवणारी आहे.
किंगमध्ये खलनायकची एन्ट्री
शाहरुख आणि सुहानाच्या 'किंग' चित्रपटात अभिषेक बच्चन खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, अशातच अमिताभ बच्चन यांचे वडील अभिषेक बच्चन यांच्या एका पोस्टने सोशल मीडिया वातावरण निर्माण केले आहे.
'किंग'मध्ये अभिषेक खलनायक बनल्याची माहिती शेअर करत एका चाहत्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट केलीय. चाहत्याच्या पोस्टवर अमिताभ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'ऑल द बेस्ट अभिषेक... आता वेळ आली आहे!' शाहरुख, अभिषेक किंवा 'किंग'शी संबंधित कोणीही अद्याप या चित्रपटाबद्दल अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही. परंतु चाहते अमिताभ बच्चन यांच्या मुलाशी संबंधित बातम्यांबद्दलच्या उत्साहाला पुष्टी मानत आहेत.
किंग हा अॅक्शन थ्रिलर चित्रपट
खूप दिवसांपासून सोशल मीडियावर बातम्या येत आहेत की, 'किंग' हा एक ॲक्शन थ्रिलर चित्रपट असणार आहे. ज्यामध्ये शाहरुख आणि सुहाना दोघेही जबरदस्त ॲक्शन करताना दिसणार आहेत. या चित्रपटासाठी सुहाना खान विशेष प्रशिक्षण घेत असल्याची माहिती समोर येत आहे. आता चाहत्यांच्या नजरा 'किंग'च्या अधिकृत घोषणेकडे लागल्या आहेत. मात्र अभिषेक बच्चन या चित्रपटाचा खलनायक ठरल्याच्या बातमीने आतापासूनच या चित्रपटासाठी वातावरणनिर्मिती केली जात आहे.