Prajakta Mali in KBC: आपल्या आवडत्या कलाकाराचा अचानक व्हिडीओ कॉल आला तर? आपल्याला कदाचित हे फक्त स्वप्नवत वाटले परंतु लोकप्रिय मराठी अभिनेत्रीच्या बाबत प्रत्यक्षात असंच काहीसं घडलं आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळी सगळ्यांना आवडते. तिच्या अभिनयाचे चाहते अफाट आहेत त्याचसोबत तिच्या सौंदर्याचीही वाहवा होताना दिसते. 'कौन बनैगा करोडपती'तून तिला चक्क अमिताभ बच्चन यांनी व्हिडीओ कॉल लावला आहे आणि तिनं प्रत्यक्ष अमिताभ बच्चन यांच्याशी संवाद साधला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'कौन बनेगा करोडपती'चं हे 15 वं पर्व आहे. सध्या हे पर्व विशेष गाजते आहे. या कार्यक्रमातून सहभाग घ्यावा आणि विजेते व्हावे असं अनेकांना वाटते. यावेळी प्राजक्ता माळीचं हे स्वप्न पुर्ण झालं आहे. नुकतीच तिनं याची इन्स्टा पोस्ट आपल्या अकांऊटवरून शेअर केली आहे. या कार्यक्रमात ऑनलाईन पद्धतीनं का होईना सहभागी होता आलं याचा प्राजक्ता माळीला प्रचंड आनंद वाटतो आहे. तिला शब्द अपुरे पडले आहेत असं तिच्या इन्स्टाग्राम पोस्टवरून समजते आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ही मालिका मोठ्या ब्रेकनंतर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ऑगस्टपासून ही मालिका परत सुरू झाली.


हेही वाचा : नातवाच्या पहिल्याच चित्रपटाबद्दल अमिताभ प्रचंड आशावादी! 'त्या' Insta पोस्टनं वेधलं लक्ष


या मालिकेतील कलाकार हे केबीसीमध्ये गेले होते. ज्याची बरीच चर्चा झाली. आता प्राजक्ताला या शोमध्ये पाहिल्यानंतर प्रेक्षकांनाही पुन्हा आनंद झाला आहे. प्राजक्ता माळीचा चाहता वर्ग मोठा आहे. यावेळी अशाच एका चाहत्यामुळे प्राजक्ताची अमिताभ बच्चन यांच्यासोबत प्रत्यक्ष बोलण्याची मनोकामना पुर्ण झाली आहे. अलीकडेच 'कौन बनेगा करोडपती'मधून अजय नावाचा एक स्पर्धक सहभागी झाला होता. आपण प्राजक्ता माळीचे भरपूर मोठे फॅन आहोत असं त्यानं यावेळी सांगितले. बीग बींनी त्याची ही इच्छा पुर्ण करत चक्क प्राजक्ता माळीला व्हिडीओ कॉल लावला. स्क्रीनवर आल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी प्रथम प्राजक्ताचे अभिवादन केले. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


यापुढे प्राजक्तानं आपल्या चाहत्यासोबत संवाद साधला. अजयला त्याच्या केबीसीतील खेळासाठी तिनं भरपूर शुभेच्छा दिल्या. सोबतच 'जर का तू जिंकलास तर आपण नक्की भेटू' असंही तिनं यावेळी अजयला आश्वासन दिलं. प्राजक्तानं अमिताभ बच्चन यांचेही मनापासून आभार मानले. स्पर्धक आपल्या लाडक्या सेलिब्रेटीला भेटल्याचं पाहून अमिताभ बच्चन यांनाही समाधान वाटले. यावेळी 'आमच्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमावर असंच प्रेम करत राहा' असंही प्राजक्तानं बिग बींना सांगितले. याचा संपुर्ण व्हिडीओ हा प्राजक्तानं शेअर केला असून आपली प्रतिक्रियानंही चाहत्यांसोबत शेअर केली आहे.