वयाच्या 80 व्या वर्षी Amitabh Bachchan फिट कसे राहतात? फेवरेट डिशमध्ये लपलंय फिटनेसचं रहस्य!
Amitabh Bachchan`s favorite dish: वयाच्या 80 व्या वर्षी अमिताभ बच्चन फिट कसे राहतात? असा सवाल अनेकांना पडलेला दिसतात. अशातच आता अमिताभ बच्चन यांनी स्वत: त्यांच्या फिटनेसवर खुलासा केलाय.
Amitabh Bachchan Diet Plan: बॉलिवूड कलाकार (Bollywood) आपल्या फिटनेसबाबत अधिक जागृत असतात. तंदुरुस्त राहण्यासाठी अनेक आव्हानांना सामोरे जावे लागतं. दररोज व्यायाम, विविध योगा पद्धतींचा वापर ते करताना दिसतात. तरूणच नाही तर वय झालेले कलाकार देखील तब्येतीची काळजी घेताना दिसतात. अनेक ऐंशीतील कलाकार आजही मोठ्या पडद्यावर कमाल दाखवत आहेत. बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan Fitness) यांच्या फिटनेस बद्दल अनेकजण आश्चर्य व्यक्त करतात.
वयाच्या 80 व्या वर्षी अमिताभ बच्चन फिट कसे राहतात? असा सवाल अनेकांना पडलेला दिसतात. अशातच आता अमिताभ बच्चन यांनी स्वत: त्यांच्या फिटनेसवर खुलासा केलाय. सध्या अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) कौन बनेगा करोडपती 14 शो होस्ट करताना दिसत आहेत. त्यावेळी ते अनेकदा त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही किस्से सांगतात. एका स्पर्धकाने त्यांना डायट प्लॅन विषयी (Amitabh Bachchan Diet Plan) प्रश्न केला. त्यावेळी त्यांनी मोठा खुलासा केलाय.
Amitabh Bachchan यांची आवडती डिश कोणती?
कौन बनेगा करोडपती (KBC) 14 मध्ये स्पर्धकाने अमिताभ बच्चन यांना त्यांची आवडती डिश विचारली. त्यावर बच्चन यांनी... मासे खूप आवडतात, असं उत्तर दिलं. जयाला मासे देखील खूप आवडतात, असंही (Amitabh Bachchan's favorite dish) ते म्हणाले. स्पर्धकाने विचारलं.... तुम्ही कोणते पदार्थ खात नाही. त्यावर, मी सर्व खाणं सोडून दिलंय. तारुण्याच्या दिवसात मी सर्व काही खायचो, पण आता मी मांसाहार, मिठाई, भात आणि पान सर्व सोडून दिलंय, असंही बच्चन म्हणाले.
आणखी वाचा - अमिताभ बच्चन यांना शेवटचं भेटून घ्या....; डॉक्टरांनी जया बच्चन यांना का दिला असा सल्ला?
दरम्यान, काही दिवसांपूर्वी कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी कोरोना टेस्ट करून घेण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा कौन बनेगा करोडपतीच्या मंचावर हजेरी लावली होती. त्यानंतर आता अमिताभ बच्चन एकापेक्षा एक शो हिट केले आहेत. वयाच्या 80 व्या वर्षी अमिताभ बच्चन यांच्या फिटनेस तरूणाईसाठी एक आदर्शच आहे.