मुंबई : बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्यासाठी यंदाची दिवाळी खूप खास होती. यावेळी त्यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र आलं आणि अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या फोटोत अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य एकत्र दिसत होता. या फोटोने इंटरनेटवर बरीच चर्चा निर्माण केली आहे. मात्र फोटोत दिसणार चित्र त्याहूनही अधिक चर्चेत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोटो व्हायरल होत आहे
अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या फोटोच्या पार्श्वभूमीवर भिंतीवर एक मोठं पेंटिंग दिसलं. पेंटिंगमध्ये एक बुल दिसत आहे. ज्याचे पुढचे पाय थेट त्याच्या शेपटीला जोडलेले होते. हे पेंटिंग पाहण्यासाठी खूप विचित्र होतं आणि जवळजवळ प्रत्येक चाहत्याचं लक्ष वेधून घेतलं.


4 कोटींची पेंटिंग
पण हे पेंटिंग कोणी बनवलं हे तुम्हाला माहिती आहे का? या पेंटिंगची किंमत किती आहे हे तुम्हाला माहीत आहे का? चला तर मग आधी याबद्दल जाणून घेऊया. अमिताभ बच्चन यांच्या ड्रॉईंग रूममधील या पेंटिंगची किंमत 4 कोटी रुपये आहे. हे चित्र मनजीत बावा (1941-2008) नावाच्या कलाकारानं बनवलं होतं.



कोण आहेत कलाकार मनजीत बावा?
मनजी यांचा जन्म पंजाबमधील धुरी येथे झाला. ते भारतीय पौराणिक कथा आणि सुफी तत्त्वज्ञानाने प्रेरित होऊन चित्रे काढत असत. प्राणी, निसर्ग, बासरीचे आकृतिबंध आणि माणूस आणि प्राणी एकत्र राहण्याच्या कल्पनेवर त्यांनी चित्रे काढली आहेत. मनजीत यांच्या चित्रांच्या विषयांबद्दल बोलताना त्यांनी माँ काली आणि भगवान शिव यांच्यावर चित्रं काढली आहेत.