Amitabh Bachchan First Love : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि शाहरुख खानची (Shahrukh Khan) यांच्यामध्ये नवं नातं सुरु होणार आहे. शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान (Suhana Khan) बिग बी यांच्या घरची सून होणार आहे. श्वेता बच्चन नंदा हिचा मुलगा आणि बिग बीचा नातू अगस्त्या नंदासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं समोर आलं आहे. अशातच अमिताभ बच्चन यांना जया बच्चन यांच्याशी नाही तर एका मराठी मुलीशी (Marathi girl) लग्न करायचं होतं अशी, बातमी समोर आली आहे. अनेकांना माहिती आहे की, रेखा (Rekha) आणि अमिताभ बच्चन यांचं अफेयर होतं. पण तुम्हाला हे माहिती आहे का? की, जया ना आणि रेखा पण नाही तर एक मराठी मुलगी बिग बी यांचं पहिलं प्रेम होती. 


अमिताभ यांची पहिली Love story


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्या लग्नाला (marriage) 49 वर्ष झाली.  पण अमिताभ यांना जया बच्चनसोबत नाही तर सर्वसामान्य आणि एका कंपनीत काम करणाऱ्या महाराष्ट्रीय मुलीशी लग्न करायचं होतं. अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यातील हे प्रेम प्रकरण फार कमी लोकांना माहिती आहे. कारण अमिताभ आणि रेखा यांची लव्हस्टोरी आजही तेवढीच लोकप्रिय आहे. या दोघांना एकत्र पाहिला आजही चाहते उत्सुक आहे. (Amitabh Bachchan First Love wanted to marry maharashtrian girlfriend trending marathi news)


कोण होती ती मुलगी ?


अमिताभ बच्चन बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी कोलकातामध्ये नोकरीच्या शोधात होतो. हा काळ होता 1963 मधील.  त्यांना शॉ वॉलेस या दारू कंपनीत नोकरी मिळाली. त्यानंतर काही दिवसांनी त्यांना 'बर्ड अँड को' या शिपिंग फर्ममध्ये नोकरी मिळाली. या कंपनी नोकरीसोबत त्यांना त्यांच्या आयुष्यातील पहिलं प्रेमही मिळालं. बिग बी यांचे मित्र दिनेश कुमार यांनी त्याचा या प्रेमाचा खुलासा केला आहे.  चंदा असं त्या मुलीचं नाव होते. अमिताभ बच्चन यांना त्या मुलीशी लग्न करायचे होते. पण मीडिया रिपोर्टनुसार बिग बी यांनी चंदा यांना लग्नासाठी मागणी घातली. मात्र तिने नकार दिला. म्हणून अमिताभ बच्चन यांचं पहिलं प्रेम अपूर्ण राहिलं. 


मग झाली जया बच्चन यांची एण्ट्री 


अमिताभ बच्चन यांना जया बच्चन यांना 1970 मध्ये पुणे (Pune) फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये पाहिले. त्यावेळी अमिताभ बच्चन स्ट्रगल करत होते. तर जया बच्चन या चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. जया होत्या अमिताभ बच्चन यांचं दुसरं प्रेम...आणि आज त्यांचा जीवनसाथी...