मुंबई : शनिवारी ब्लॉगवर अमिताभ बच्चन यांनी शस्त्रक्रियेची माहिती दिली. यानंतर बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan First Blog after Surgery)  यांच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला. सोशल मिडीयावर बिग बींकरता अनेकांनी प्रार्थना केल्या आणि त्यांच्या प्रकृतीकरता शुभेच्छा दिल्या. चाहत्यांनी इतके प्रेम आणि चिंता व्यक्त केलेली पाहून बिग बी स्वत:ला रोखू शकले नाही आणि शस्त्रक्रियेनंतर लगेचच त्यांनी  स्वत:च्या आरोग्याची माहिती दिली.


अमिताभ बच्चन यांनी मानले आभार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपण सुखरूप असल्याचे सांगून अमिताभ बच्चन यांनी पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगवर एक छोटीशी ओळ लिहिली आहे. अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगवर लिहिले आहे की, 'माझ्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल मनापासून खूप आभार आणि प्रेम ...'. ही एक ओळ लिहिण्याबरोबरच त्यांनी स्वतःची अनेक छायाचित्रे ब्लॉगवरही शेअर केली आहेत.



मोतीबिंदुची झाली शस्त्रक्रिया 


वृत्तसंस्था आयएएनएसच्या (IANS) वृत्तानुसार, अमिताभ बच्चन यांच्यावर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सुपरस्टार २४ तासांत घरी परत येईल असं सांगण्यात येत आहे. मात्र, त्यांच्या कार्यालयाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 


बिग बींनी दिले पहिले 'हे' संकेत


अमिताभ बच्चन यांनी शनिवारी रात्री आपल्या ब्लॉगवर शस्त्रक्रियेला जाण्याविषयी लिहिले. या ब्लॉगद्वारे त्यांनी आपल्या चाहत्यांनी थोडी पूर्वकल्पना दिली होती.  ते वैद्यकीय स्थितीबद्दल सविस्तर बोलत नव्हते किंवा आपल्याला कोणत्या प्रक्रियेमधून जावे लागेल याबद्दल बोलले नाही. अभिनेत्याच्या चांगल्या आरोग्याच्या उद्देशाने चिंताग्रस्त चाहत्यांनी सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या. 


'या' चित्रपटात दिसणार बिग बी


बिग बींचे एका मागोमाग एक चित्रपट येत आहेत. त्यांचे पुढील चित्रपट रुमी जाफरीचे मनोवैज्ञानिक सस्पेन्स नाटकचा 'चेहरा' आहे, ज्यात इमरान हाश्मी आणि रिया चक्रवर्ती यांची मुख्य भूमिकेत आहेत . सध्या अभिनेता अजय देवगण दिग्दर्शित थ्रिलर 'मेडे' चित्रपटाचे चित्रीकरण करत आहेत. या चित्रपटात रकुल प्रीत सिंह देखील आहे. याशिवाय ते ‘झुंड’ आणि ‘ब्रह्मास्त्र’ मध्येही दिसणार आहे.