मुंबई- बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नुकताच अमिताभ यांनी एक ब्लॉग शेअर केला आहे. हा ब्लॉग शेअर करत एका ५ वर्षाच्या मुलाने दिलेला सल्ला ऐकून त्यांना आश्चर्य झाल्याचे सांगितले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमिताभ त्यांच्या या ब्लॉगमध्ये या विषयी सांगताना म्हणाले,  "मी आरबीआयच्या एका कॅम्पेनसाठी काम करत होतो. त्यावेळी एका सीनमध्ये ५-६ वर्षाचा एक मुलगा होता. एका तालीमत तो माझ्या जवळ आला आणि म्हणाला, तुमचं वय काय आहे? मी ८० म्हणालो. तो मुलगा मागे सरकला आणि म्हणाला, तर काम का करता? माझे आजी-आजोबा घरी बसून चिल करत आहेत...तुम्ही सुद्धा असं करायला हवं." 


 



पुढे अमिताभ म्हणाले, "त्या मुलाच्या प्रश्नावर माझ्याकडे उत्तर नव्हते. पहिली गोष्ट, मी त्या ५ वर्षाच्या मुलाच्या या प्रश्नावर चकित झालो. दुसरी गोष्ट म्हणजे, माझ्याकडे खरंच उत्तर नव्हतं. त्यामुळे शूटिंग संपल्यावर मी त्याला निरोप देण्यासाठी गेलो आणि त्याच्यासोबत एक फोटो क्लिक केला अन् एक ऑटोग्राफ दिला." 


अमिताभ सध्या 'कौन बनेगा करोडपती १४' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. २००० साला पासून अमिताभ या शोचं सुत्रसंचालन करत आहेत. फक्त त्यांनी २००३ साली प्रदर्शित झालेल्या तिसऱ्या पर्वाचे सुत्रसंचालन केले नव्हते. 


अमिताभ लवकर 'ब्रम्हास्त्र' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत आलिया भट्ट, रणबीर कपूर, मौनी रॉय आणि नागार्जुन दिसणार आहेत. हा चित्रपट ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. या शिवाय अमिताभ नीना गुप्ता आणि रश्मिका मंदाना यांच्यासोबत 'अलविदा' या चित्रपटात दिसणार आहेत.