Aaradhya Bachchan Youtube : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh bachchan)  यांची नात आणि अभिषेक बच्चन, ऐश्वर्या रायची (Aishwarya Rai Bachchan ) लेक आराध्या बच्चननं (Aaradhya Bachchan) दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. 11 वर्षांच्या आराध्या विषयी फेक न्यूज पसरवणाऱ्या युट्यूब चॅनलविरोधात बच्चन कुटुंबाने कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. या याचिकेत आराध्या विषयी विनाकारण पसरवल्या जाणाऱ्या अफवांविषयी आराध्यानं म्हटलं होतं. त्यावर आज सुनावणी झाली. या सुनावणीनंतर कोर्टानं युट्यूब चॅननला महत्त्वाचे आदेश दिले आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या याचिकेवर दिल्ली हायकोर्टानं प्रत्येक मुलाला सन्मानानं जगण्याचे अधिकार आहेत. मग ते मुलं कोणाचंही असो एका साधारण व्यक्तीचे किंवा मग कोणत्या सेलिब्रिटीचे, सगळ्यांना समान अधिकार आहेत. या सगळ्यात त्यांच्याविषयी अफवा पसरवणं चुकीचं आहे. कारण त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले असने महत्त्वाचे आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक बातम्यांमध्ये आराध्याचं निधन झाल्याचे म्हटले होतं. आराध्या विषयी अशा खोट्या बातम्या किंवा मग अफवा पसरवण चुकीचं आहे. हे सगळं थांबवायला हवं असं या याचिकेत म्हटलं आहे. 


आराध्याच्या याचिकेवर दिल्ली हायकोर्टाच्या सुनावणीत काय झाले? 


दिल्ली हायकोर्टात न्यायाधीश सी हरीशंकर यांच्या समोर आज सुनावणी पार पडली होती. त्यानंतर या संबंधीत युट्यूब चॅननला आराध्याविषयी या खोट्या बातम्यांवर बंदी घालण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत. त्यांनी सांगितले की आराध्याविषयी कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अशी बातमी असेल तर ती काढून टाकावी आणि ब्लॉक करून सांगितले. आराध्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याविषयी खोटे दावे करणारे कोणत्याही प्रकारचे व्हिडीओ किंवा आर्टिकल काढून टाकण्यास सांगितले आहे. 


दिल्ली हायकोर्टानं यूट्यूबला फटकारले


दिल्ली हायकोर्टानं यूट्यूबला फटकारत विचारले की अशा प्रकारणात तुमच्याकडे काही नियम नाहीत का? जेव्हा तुम्हाला कळतं की अशा प्रकारचे व्हिडीओ युट्युबवर शेअर करण्यात आले आहेत. तेव्हा असे व्हिडीओ जायला नवं यासाठी कोणताही विचार करण्यात आला नाही का? अशा प्रकारणात तुमची जबाबदारी नाही का?



हेही वाचा : 'इथे योग्य दरात ताक मिळेल...', पत्नीमुळे Siddharth Chandekar वर आली हे काम करायची वेळ


आराध्या विषयी बोलायचे झाले तर ती मुंबईच्या धीरुभाई अंबानी इन्टरनॅशनल शाळेत शिकत आहे. ऐश्वर्या आणि अभिषेकनं 2007 साली सप्तपदी घेतल्या आहेत. तर 16 नोव्हेंबर रोजी 2011 साली आराध्याचा जन्म झाला. आराध्याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. आराध्याचे हिंदी बोलतानाचे व्हिडीओ खूप व्हायरल होतात.