'इथे योग्य दरात ताक मिळेल...', पत्नीमुळे Siddharth Chandekar वर आली हे काम करायची वेळ

Siddharth Chandekar Viral Video :  सिद्धार्थ चांदेकरनं सोशल मीडियावर मितालीचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मितालीनं केलेल्या त्या कामामुळे तो ताक विकत आहे असं म्हटलं आहे. तर कोणाला योग्य दरात ताक हवं असेल तर त्याला संपर्क साधू शकता असं देखील तो म्हणाला. 

दिक्षा पाटील | Updated: Apr 20, 2023, 12:58 PM IST
'इथे योग्य दरात ताक मिळेल...', पत्नीमुळे Siddharth Chandekar वर आली हे काम करायची वेळ title=
(Photo Credit : File Photo/ Siddharth Chandekar Instagram)

Siddharth Chandekar Video : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) आणि त्याची पत्नी मिताली मयेकर (Mitali Mayekar) यांची जोडी चाहत्यांमध्ये चर्चेत असते. सिद्धार्थ हा सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. फक्त इतकंच नाही तर ते दोघं एकमेकांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्यांच प्रेम सगळ्यांसोबत शेअर करताना दिसतात. दरम्यान, नुकतंच सिद्धार्थनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मितालीनं दोन दिवस पिण्यासाठी चक्क 8 लीटर ताक मागवले आहे. 

सिद्धार्थनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला सिद्धार्थ बोलताना दिसत आहे. या वेळी सिद्धार्थ म्हणाला, मी माझ्या बायकोला थोडसं ताक मागवायला सांगितलं होतं अमुलचे 7-8 टेट्रा पॅक्स म्हटलं दोन दिवस पुरतील. त्यानंतर सिद्धार्थ एक बॉक्स दाखवतो आणि त्या बॉक्समध्ये अमुलचे 1-1 लीटरचे असे 8 मोठे कॅन मागवले होते. त्याविषयी सांगत सिद्धार्थनं आधी ताकची कॅन हातात घेत दाखवली आणि  म्हणाला, माझ्या बायकोनं 8 लीटर ताक मागवलं. त्यानंतर मितालीकडे कॅमेरा करत सिद्धार्थ म्हणाला, तुला किती ताक किती मागवायचं होतं? तर सिद्धार्थच्या या प्रश्नावर उत्तर देत मिताली म्हणते 8 लीटर. हे ऐकताच सिद्धार्थ बोलतो खरं सांग आणि मिताली बोलते खरंच. पुढे मिताली बोलते एवढ्या उन्हाळ्यात सतत हायड्रेट राहण्यासाठी मी खूप ताक मागवलं. हे आपण संपवूया पुढच्या दोनएक दिवसात. पुढे स्टे हायड्रेट म्हणतं मिताली पुढे निघून जाते. व्हिडीओच्या शेवटी सिद्धार्थ तर माझ्याकडे ताक आहे आणि तेही खूप आहे. सांगा मग कोणाला हवं असेल तर. हा व्हिडीओ शेअर करत सिद्धार्थनं कॅप्शन दिलं की 'जर कोणाला हवं असेल तर मला कळवा. योग्य दरात ताक मिळेल.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : यश चोप्रा यांची पत्नी Pamela Chopra काळाच्या पडद्याआड

सिद्धार्थच्या या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी म्हणाला, 'बसुयात मग आज रात्री.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'मला दोन-एक लीटर दे.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'उन्हाळा संपेपर्यंत विषय घ्यायचा नाही आता.... हवं तर अंघोळीला वापरा skin hydrate होईल.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'होतं रे असं कधी तरी.' दुसरा नेटकरी म्हणाली, 'माझ्या नवऱ्याला त्याची बहीण भेटली.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'मग बरोबर आहे ना... त्या बॉक्समध्ये सात आठच पॅक्स आहेत.' सिद्धार्थनं शेअर केलेल्या या व्हिडीओवर कमेंट करत मिताली म्हणाली, 'पण मला तितकंच ताक मागवायचं होतं.'