Navya Naveli Nanda Spotted With Siddhant Chaturvedi: हल्ली बॉलिवूडमधील जोरात चर्चा रंगते ती म्हणजे स्टार कीड्सची. कोण कोणाला डेट करतेय याची येथे जोरात चर्चा रंगलेली असते. सारा अली खान, सारा तेंडूलकर, अनन्या पांडे, सुहाना खान, जान्हवी कपूर असे स्टार कीड्स कोणाकोणाला डेट करतायत याची चर्चा रंगलेली असते. सध्या इंटरनेटवर जोरात चर्चा रंगलेली आहे ती म्हणजे अमिताभ बच्चन यांची नातं नव्या नवेली नंदा हिची. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन यांची नातं नव्या नवेली नंदा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिच्या हटके स्टाईलसाठीही ओळखली जाते. काही दिवसांपुर्वी ती एका लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्यासोबत गोव्याला व्हेकेशनला गेली होती. आता ती त्याच्याच सोबत मुव्ही डेटवर गेलेली दिसून आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गल्ली बॉय या चित्रपटातून अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीनं बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. त्याच्या पहिल्याच चित्रपटानं त्याला अमाप लोकप्रियता मिळवून दिली होती. हा चित्रपट 2019 च्या सुरूवातीला प्रचंड गाजला होता. या चित्रपटाला अनेक पुरस्कारही प्राप्त झाले होते. त्यानंतर सिद्धांतची चर्चा चांगलीच रंगली होती. राजीव मसंद यांच्या एका मुलाखतीदरम्यान त्यानं थेट नेपोटिझमवर निशाणा साधला होता. अनन्या पांडेला टोमणा मारत तो म्हणाला होता की जेव्हा आमची स्वप्नं पुर्ण होतात तेव्हा यांचा (स्टार कीड्स) संघर्ष सुरू होतो. त्याच्या या वक्तव्यावर अनेकांनी प्रतिक्रिया मांडल्या होत्या. त्यानंतर नेपोटिझम हा विषय प्रचंड गाजला होता. 


हेही वाचा - ''अगं बाई जरा आवर''; शाहरूखला तिनं नॉनस्टॉप kiss केलं, VIDEO पाहून नेटकरी हैराण


सध्या नव्या नंदा आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्या डेटिंग जोरात चर्चा सुरू झाल्या आहेत. काही दिवसांपासून त्यांच्या डेटिंगच्या चर्चा या रंगल्या आहेत. काही दिवसांपुर्वी ते दोघं एअरपोर्टवर स्पॉट झाले होते आता ते दोघं पुन्हा एकदा स्पॉट झाले असून यावेळी ते मुव्ही डेटला गेले होेते. सध्या त्यांचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सोशल मीडियावरून त्यांचा एक व्हिडीओ सध्या प्रेक्षकांच्या नजरेत आला आहे. त्यात ते मुव्ही डेटला गेले असल्याचे समोर आले आहे. ज्यात ते दोघं एका मल्टिप्लेक्सच्या बाहेरून येताना दिसत आहेत. यावेळी दोघंही कॅज्यूअल समर वेअरमध्ये स्पॉट झाली. पापराझींनी त्या दोघांना क्लिक करायची एकही संधी सोडली नाही. त्यातून ते दोघंही अगदी चील दिसले.