मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका आता जवळपास एका आठवड्यापासून अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील 'प्रतीक्षा' बंगल्याची भिंत पाडण्याची तयारी करीत आहे. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बुधवारी रात्री अमिताभ यांच्या बंगल्याबाहेर पोस्टर लावलं आहे. या बॅनरमध्ये 'बिग बी शो बिग हार्ट' असं लिहिलं आहे, या पोस्टरनुसार, अमिताभ बच्चन यांचा बंगला संत ज्ञानेश्वर मार्गावर आहे आणि बीएमसीला हा रस्ता रुंद करायचा आहे, यामुळे अमिताभ यांच्या बंगल्याची भिंत पाडावी लागेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमिताभ बच्चन यांच्या घरासमोर कायम ट्राफित असतं. त्यामुळे बीएमसीला अमिताभ यांच्या बंगल्याशेजारील रस्ता 60 फूट रुंद करायचा आहे, सध्या या रस्त्याची रुंदी 45 फूट आहे. यापूर्वी 2017मध्ये बीएमसीने अमिताभ बच्चन यांना नोटीस पाठविली होती, परंतु बिग बींनी अद्याप या नोटीसला उत्तर दिलेलं नाही.एका वृत्तानुसार, ''मुंबई उपनगरीय कलेक्टर सिटी सर्व्हेच्या अधिकाऱ्यांना रस्ता रुंदीकरणासाठी पाडण्यासाठी आवश्यक असलेल्या बंगल्याच्या भागाची अचूक माहिती देण्याचे आदेश बीएमसीने दिली आहेत."



जेव्हा नगरसेवकांचे वकील ट्यूलिप ब्रायन मिरांडा यांना विचारलं गेलं की, अमिताभ बच्चन व्यतिरिक्त या रस्त्याच्या आसपास इतर घरेही आहेत तर मग फक्त अमिताभ यांच्या बंगल्याची भिंत तोडण्याची चर्चा का होत आहे. यावर ट्यूलिप म्हणाले की, 'अमिताभ यांच्या बंगल्याशेजारील प्लॉटवर एक नाला बांधला गेला होता, मात्र अमिताभ यांच्या घराला काहीही केलं नाही. तर दुसरीकडे हा प्रकल्प अत्यंत निकडीचा आहे, कारण या परिसरातील काही शाळा, इस्कॉन मंदिर आणि मुंबई स्मारके असल्याने आणि अमिताभ यांच्या बंगल्यामुळे हा प्रकल्प अचानक बंद करण्यात आला होता.