मुंबई : टीव्हीवरील लोकप्रिय शो 'कौन बनेगा करोडपती' चे 10 वे सिझन लवकरच सुरू होत आहे. या सिझनमध्ये देखील लोकांना सहभाग घेण्यासाठी रजिस्ट्रेशन करावा लागणार आहे. ऑनलाईन आणि अॅपच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन करून टीव्हीवर विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तर द्यावी लागणार आहेत. अचूक उत्तर दिल्यावर केबीसीची टीम शॉर्ट लिस्ट करणार आणि त्यानंतर ऑडिशनला बोलावलं जाणार आहे. नुकताच या शोचा प्रोमो रिलीज झाला आहे. अमिताभ बच्चन यांचा हा शो अगदी जोमाने व्हायरल होत आहे. हा प्रोमो दंगल फेम दिग्दर्शक नितेश तिवारीने दिग्दर्शित केला आहे. या व्हिडिओतून एका गरिब टॅक्सी ड्रायव्हरची गोष्ट सांगण्यात आली आहे. 


संघर्ष करायला शिकवणारा हा प्रोमो 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रोमोतून असं दाखवलं आहे की, टॅक्सी ड्रायव्हर लखन आपल्या मुलाला शिकवण्यासाठी कशी धडपड करत आहे हे दाखवलं आहे. मुलाच्या इंजिनिअरच्या शिक्षणासाठी कशा प्रकारे लखन दिवस - रात्र मेहनत करत आहे. मात्र पुढील शिक्षणासाठी पैसा कसा उभा करावा हे विचार करत असताना तो दिसतो. आणि नंतर लगेचच अमिताभ बच्चन यांच्या समोरच्या हॉट सीटवर बसताना दिसत आहे. तेव्हा बिग बी म्हणतो की, तुमचा जो संघर्ष तर कौतुकास्पद आहे. पण जर तुम्हाला इथे यायला नसतं मिळालं तर काय केलं असतं. त्यावर लखन उत्तर देतो की, तरी देखील मी हरलो नसतो.