Amitabh Bachchan 'Horrible Error' Tweet : अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सोशल मीडिया (Social Media)वर खूप ऍक्टिव असतात. अनेकदा ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आणि आपल्या ब्लॉगव खासगी गोष्टी शेअर करत असतात. या दसऱ्याच्या दिवशी देखील बिग बी अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. मात्र आपल्या पोस्टमध्ये अमिताभ बच्चन यांनी एक घोड चूक केली. मग काय, एका चाहत्याने त्यांची क्लास घेतली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमिताभ बच्चन कितीही व्यस्त असू द्या. ते सोशल मीडियासाठी वेळात-वेळ काढतातच. 'कौन बनेगा करोडपती 14' ऑफ एअर  झाल्यानंतर त्यांचं बिझी शेड्यूल नक्कीच कमी झालं आहे.  यामुळेच म्हणून बिग बींना त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांचे सोशल मीडिया खाते तपासण्यासाठी वेळ काढला आणि त्यांच्या ट्विटमध्ये होत असलेल्या त्यांच्या चुका लक्षात आल्या.


लोकांना बीग बीं सारख्या मोठ्या स्टारकडून अशी चूकीची अपेक्षा नाहीये. यासाठीच बीग बींनी या पोस्टसाठी माफी मागितली आहे. त्यामुळे लोकं त्यांना माफ करायच्या मुडमध्येही दिसत नाहीयेत.  
 अमिताभ यांनी त्यांच्या एका ट्विटमध्ये 'उंचाई' चित्रपटाचा उल्लेख केला होता, त्यानंतर त्यांच्या ट्विटचा आकडा योग्य नसल्याचं त्यांना समजलं. त्याला ही मोठी चूक वाटली.


80 वर्षीय अमिताभ बच्चन यांनी पुढच्या ट्विटमध्ये चुकीबद्दल पुन्हा माफी मागित लिहिलं की, 'एक भयंकर चूक. T 4514 नंतर माझे सगळे T नंबर चुकीचे झाले. T 5424 ते T 5430 पर्यंतचे सगळे आकडे चुकीचे आहेत. हे T 4515 ते T 4521 असायला हवं. मी माफी मागतो. बिग बी यांच्याकडून याआधीही अशा चुका झाल्या आहेत आणि त्यांना त्यांच्या चुका मान्य करण्यात कोणतीही अडचण नाही. अनेकांना त्यांचा हा प्रामाणिकपणा पटला आहे, तर काहींनी मात्र त्यांच्या ट्विटची खिल्ली उडवली.



एका युजरने गंमतीत ट्वीट करत म्हटलं की, 'सर्वात मोठी चूक अजूनही ती आहे की जेव्हा तुम्ही 'कभी खुशी कभी गम'मध्ये लग्नानंतर शाहरुख खानला स्वीकारलं नाही. साहेब असं चालणार नाही. T नंबरची लवचिकता हातातून निसटली आहे, म्हणून दुसरं अकांऊन्ट तयार करा.' तर अजून एक युजर्स या नंबरच्या वापराबद्दल गोंधळून गेला आणि म्हणाला की, बिग बी चुकीच्या संख्येबद्दल इतके चिंतित का आहेत?'